शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

'त्या' चौघांसोबत नीरज चोप्राची मॅच पाहिली अन्...; हत्या झालेल्या डॉक्टरसोबत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 17:10 IST

कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री उशिरा बलात्कार करून ३१ वर्षीय डॉक्टरची हत्या करण्यात आली.

RG Kar Medical College Crime : पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरने केलेल्या क्रूरतेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली आहे. त्याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून अटकेत  असलेला आरोपी संजय रॉय याच्याबाबत धक्कादाय माहिती समोर आली आहे. डॉक्टरची हत्या करण्याआधी आरोपीने काय केलं होतं हे समोर आलं आहे. या सगळ्या प्रकाराआधी मृत डॉक्टर चार सहकाऱ्यांसोबत अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे शुक्रवारी एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालात प्रशिक्षणार्थी डॉक्टरचे डोळे, तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय महिला डॉक्टरच्या मानेचे हाडही तुटले होते. पोलिसांनी अटक केलेल्या संजय रॉयने त्या दिवसाचा घटनाक्रम सांगितला आहे. या प्रकरणात कोलकाता पोलीस आता मृत डॉक्टरच्या चार साथीदारांची चौकशी करणार आहेत जे घटनेपूर्वी तिच्यासोबत होते. 

गुरुवारी रात्री, या भीषण घटनेच्या काही तास आधी, ३१ वर्षीय महिला डॉक्टरने केवळ त्याच्या चार सहकाऱ्यांसोबत जेवण केले नाही तर नीरज चोप्राची ऑलिम्पिक मॅचही एकत्र पाहिली. नीरजची ऑलिम्पिकमधील स्पर्धा पाहतच सर्वांनी एकत्र जेवण केलं होतं. यानंतर पीडित महिला डॉक्टरने तिच्या आईला फोन केला आणि जेवल्याची माहिती दिली.. रात्रीचे जेवण झाल्यानंतर मृत डॉक्टरचे सर्व सहकारी ड्युटीसाठी गेले, तर ती स्वत: सेमिनार हॉलमध्ये अभ्यासासाठी गेली होती. अभ्यासदरम्यान पीडिता तिथेच झोपी गेली होती. 

पोलिसांनी यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून त्याध्ये संजय रॉय पहाटे ४ वाजताच्या सुमारास इमारतीत प्रवेश करताना दिसत आहे, जिथे ती महिला डॉक्टर होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास महिला डॉक्टरचा मृतदेह तेथे आढळून आला. प्राथमिक तपासात तिच्या डोळ्यावर, तोंडावर, चेहऱ्यावर आणि प्रायव्हेट पार्टवर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसdoctorडॉक्टर