शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

 त्या महिला डॉक्टरच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या डायरीमुळे संशय वाढला? त्यात आहे काय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 10:32 IST

Kolkata Doctor Rape-Murder Case Update: कोलकात्यामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या महिला डॉक्टरच्या मृतदेहाजवळ एक डायरी सापडली होती. या डायरीमधील काही पानं फाटलेली होती. त्यामुळे या डायरीच्या फाटलेल्या पानांमध्ये काही गुपित दडलेलं होतं का, असा प्रश्न तपासकर्त्यांसमोर उपस्थित झाला आहे.

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यासह देशातील समाजमन ढवळून निघालं आहे. तसेच या घटनेचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवनवे प्रश्न समोर येत आहेत. आता महिला डॉक्टरच्या मृतदेहाजवळ एक डायरी सापडली होती. या डायरीमधील काही पानं फाटलेली होती. त्यामुळे या डायरीच्या फाटलेल्या पानांमध्ये काही गुपित दडलेलं होतं का, असा प्रश्न तपासकर्त्यांसमोर उपस्थित झाला आहे. हे पान जाणीवपूर्वक फाडलं गेलं का? अशीही शंका उपस्थित होत आहे.

कोलकाता पोलिसांनी सीबीआयकडे एक डायरी सुपुर्द केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही डायरी महिला डॉक्टरच्या मृतदेहासमोर सापडली होती. या डायरीची काही पानं फाडलेली होती. तसेच काही पानांचे तुकडे झालेले होते. आता मिळत असलेल्या माहितीनुसार कोलकाता पोलिसांनी डायरीमधील फाटलेली पानं सीबीआय अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केली आहेत.

मिळत असलेल्या माहितीनुसार ड्युटीवर उपस्थित असलेल्या प्रत्येक डॉक्टरकडे एक डायरी असते. त्यावर  औषधांची नावं आणि इतर गोष्टी लिहिलेल्या असतात.  दरम्यान, ही डायरी समोर आल्यानंतर सीबीआयने सतर्क होत अधिक बारकाईने तपासाला सुरुवात केली आहे. यादरम्यान, सीबीआयची टीम आज या प्रकरणी अटक केलेला मुख्य आरोपी संजय रॉय याची सायको अॅनॅलिसीस टेस्ट करणार आहे. यादरम्यान, सीएफएसएलची टीम त्याची तपासणी करून या घटनेबाबतच्या कड्या जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच सीबीआय या डायरीमधील फाटलेल्या पानांबाबतही काही प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणी सीबीआयकडून रुग्णालय प्रशासनाने ही घटना घडल्यानंतर केलेल्या कृतीबाबतही बारकाईने तपास केला जात आहे. त्याबाबत सीबीआयने आरजी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाली असतानाही तिच्या कुटुंबीयांना तिने आत्महत्या केली, अशी चुकीची माहिती का दिली गेली, याचा शोध सीबीआयकडून घेतला जात आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरCBIगुन्हा अन्वेषण विभाग