शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

कोलकाता डॉक्टर तरुणी हत्या प्रकरणाचा तपास CBI करणार, उच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 19:53 IST

Kolkata doctor rape and murder case : या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. देशभरात सुरू असलेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Kolkata doctor rape and murder case :पश्चिम बंगालच्या कोलकातामधील आरजी कर कॉलेज आणि रुग्णालयात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. देशभरात सुरू असलेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

उच्च न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे तातडीने सीबीआयकडे सोपवण्यास सांगितले आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आरजी कर हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी शनिवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती.

दरम्यान, याआधी उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला या प्रकरणाची केस डायरी दुपारी १ वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. सुनावणीदरम्यान, रुग्णालय प्रशासनाने हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले, त्यावर उच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली. रुग्णालय प्रशासनाच्या अनेक त्रुटी असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. 

रुग्णालय प्रशासनानेच गुन्हा नोंदवायला हवा होता. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली होती. याशिवाय. सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या इतर अनेक जनहित याचिका (पीआयएल) ही दाखल करण्यात आल्या होत्या.

देशभरात निषेधया घटनेचा देशभरातील सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी निषेध केला. पश्चिम बंगाल आणि दिल्लीतील निवासी डॉक्टरांनी अनिश्चित काळासाठी संप सुरू केल्याने ओपीडी सेवा आणि आपत्कालीन नसलेल्या शस्त्रक्रियांवर परिणाम झाला. फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनच्या (फोर्डा) आवाहनावरून हा संप सुरू झाला. जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप संपणार नसल्याचे फोर्डने म्हटले आहे.

न्यायालयाने काय म्हटले?तत्पूर्वी, याचिकांवर सुनावणी करताना सरन्यायाधीश टीएस शिवगनम आणि न्यायमूर्ती हिरणमय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने तपासात काही त्रुटी असल्याचे आढळून आले. वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य संदीप घोष यांचे म्हणणे नोंदवले गेले आहे का, अशी विचारणा खंडपीठाने केली, त्यावर राज्य सरकारच्या वकिलांनी नकारार्थी उत्तर दिले. आरजी कार हॉस्पिटलच्या प्राचार्यपदाचा राजीनामा दिलेल्या घोष यांना काही तासांतच कलकत्ता नॅशनल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या प्राचार्यपदी कसे बहाल करण्यात आले, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालHigh Courtउच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारीCBIगुन्हा अन्वेषण विभागdoctorडॉक्टर