कोलवाळ गृहनिर्माण वसाहत रस्त्य्

By Admin | Updated: October 6, 2015 00:42 IST2015-10-06T00:42:01+5:302015-10-06T00:42:01+5:30

कोलवाळ गृहनिर्माण वसाहत रस्त्याच्या बाजूच्या झाडा-झुडूपांची साफसफाई

Kolhal Housing Cohort Road | कोलवाळ गृहनिर्माण वसाहत रस्त्य्

कोलवाळ गृहनिर्माण वसाहत रस्त्य्

लवाळ गृहनिर्माण वसाहत रस्त्याच्या बाजूच्या झाडा-झुडूपांची साफसफाई
बार्देस : कोलवाळ ग्रामपंचायतीच्या ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत कोलवाळ गृहनिर्माण वसाहतीतील रस्त्याच्या बाजूला वाढलेली झाडे-झुडूपे साफ करण्यात आली. वसाहतीतील रस्ते जास्त वळणदार असल्याने व दोन्ही बाजूला 1 ते 2 मीटर झुडूपे वाढल्याने पुढून येणारे वाहन दिसत नव्हते व अपघात होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. स्थानिक रहिवाशी योगानंद गावस, उदय साळगावकर, मदन पिळर्णकर मिळून एकूण 35 जणांनी सांचे निवेदन सरपंचाना दिले होते. पंच कृष्णा आमरे यांनी दखल घेऊन पंच मंडळाच्या सभेत मान्यता घेऊन त्वरीत काम मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व सरपंच अमिता नाईक व पंचायत मंडळाचे आभार मानले. या सर्व रस्त्यावर शिकाऊ वाहनांची वर्दळ चालू असते. आरटीओ म्हापसा वाहन तपासणी व वाहन चालकांची चाचणी याच रस्त्यावर घेतात. (प्रतिनिधी)

Web Title: Kolhal Housing Cohort Road