कोदामेंढी....
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:15+5:302015-01-22T00:07:15+5:30
तलाठी गैरहजर, शेतकरी त्रस्त

कोदामेंढी....
त ाठी गैरहजर, शेतकरी त्रस्तकोदामेंढी येथील प्रकार : कारवाईची मागणीकोदामेंढी : तलाठी मुख्यालयी गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांची अनेक महत्त्वपूर्ण कामे रखडली आहेत. तलाठ्याच्या गैरहजरपणामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त असून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. मंगळवारी स्थानिक तलाठी कार्यालयात परिसरातील अनेक गावांचे शेतकरी तलाठी सोनटक्के यांची प्रतीक्षा करीत होते. काहींनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांनी लवकर पोहोचतो असे सांगितले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत वाट पाहून तलाठी न आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. याबाबत कोतवाल देवानंद मेश्राम यांना विचारणा केली असता, मंगळवारी तलाठी शेतकऱ्यांच्या अनुदान याद्या तयार करण्यासाठी मौदा तहसील कार्यालयात असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे तलाठी गैरहजर असल्याचा प्रकार येथे सतत बघावयास मिळतो. तलाठ्याचे मुख्यालय येथे असताना ते मुख्यालयी राहत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.या संदर्भात तहसीलदार पडोळे यांच्याशी सपंर्क साधला असता, सदर तलाठ्यास मी मंगळवारी बोलाविले नसल्याचे त्यांनी सांगितले. तलाठी सोनटक्के यांना मुख्यालयी राहून नागरिकांची कामे वेळीच करण्याची निर्देश दिले आहेत. परंतु नागरिकांना नाहक त्रास दिला जात असेल तर कारवाई करू असेही पडोळे यांनी स्पष्ट केले.कोदामेंढी, अरोली, बेरडेपार, अडेगाव, तांडा, धर्मापुरी, खरडा, नांदगाव, धानोली, इंदोरा, वाकेश्वर, सिरसोली, वायगाव, सुकळी, तोंडली, वाघबोडी, बोरी, खंडाळा, राजोली, रेवराळ, नवरगाव, श्रीखंडा, मोरगाव, खात, महालगाव, पिंपळगाव, खिडकी व परिसरातील गावे मौदा तहसील कार्यालयापासून २५ किमी अंतरावर आहेत. यातील अनेक गावातील तलाठी जनतेची दिशाभूल करतात. तहसील कार्यालयात काम होते, असे कारण पुढे करून मुख्यालयी राहत नाहीत. परिसरातील गावांच्या तलाठ्यांना तहसील कार्यालयात वारंवार न बोलविता मंडळ कार्यालयात तहसीलदारांनी बैठक घेऊन स्थानिक पातळीवर शासनाच्या योजना व कामांचे नियोजन करण्याची नितांत गरज आहे. तसेच कामचुकार अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)