शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लस घेतल्यानंतर पंतप्रधान काय म्हणाले, परिचारीका पी. निवेदिता यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 11:59 IST

Pm Narendra Modi Vaccination : परिचारीका पी. निवेदिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली लस

ठळक मुद्देपरिचारीका पी. निवेदिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली लसदिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन मोदींनी घेतली लस

आजपासून म्हणजेच १ मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, लस दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय प्रतिक्रिया दिली याचा खुलासा त्यांना लस देणाऱ्या परिचारीका पी. निवेदिता यांनी केला."सरांना (पंतप्रधान नरेंद्र मोदी) भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीचा पहिला डोस देण्यात आला. दुसरा डोस त्यांना २८ दिवसांनी देण्यात येईल. त्यांना लस दिल्यानंतर त्यांनी आम्हाला तुम्ही मूळच्या कोणत्या ठिकाणाहून आहात असा प्रश्नही केला. तसंच यानंतर प्रतिक्रिया देताना लस दिलीसुद्धा हेदेखील मला समजलं नाही (लगा भी दिये, पका भी नहीं चला)," असंही ते म्हणाल्याचे पी. निवेदिता यांनी डी.डी. न्यूजशी बोलताना सांगितलं. गेल्या तीन वर्षांपासून आपण एम्समध्ये कार्यरत आहोत आणि सध्या कोरोना लसीकरण केंद्रात काम करत आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लसीकरणासाठी आल्याचं समजलं. त्यांना लस देण्यासाठी मला बोलावलं तेव्हा ते पोहोचल्याची माहिती मिळाली. त्यांना भेटून खुप आनंद झाला. त्यांनी आमच्याशी संवादही साधला. त्यांना आता पुढील डोस २८ दिवसांनी देण्यात येणार असल्याचंही पी निवेदिता यांनी सांगितलं.पी निवेदिता या मूळच्या पुडुचेरीच्या रहिवासी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लस देताना त्यांच्यासोबत केरळच्या मूळ रहिवासी असलेल्या परिचारीका रोसम्मा अनिल यादेखील होत्या. यावेळी त्यांच्यासोबत एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधानांनी लस घेतल्यानंतर सर्व प्रोटोकॉलचं पालन केलं आणि अर्धा तास त्या ठिकाणी थांबलेही होते.काय म्हणाले मोदी?"एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीनं काम केलं, ते कौतुकास्पद आहे." तसंच, लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना आवाहन करत भारत कोरोनामुक्त बनवूयात, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीAIIMS hospitalएम्स रुग्णालय