देशद्रोहाच्या आरोपाचा अर्थ कळतो ? - दिल्ली उच्च न्यायालय

By Admin | Updated: March 1, 2016 19:58 IST2016-03-01T19:53:41+5:302016-03-01T19:58:36+5:30

तुम्हाला देशद्रोहाच्या आरोपाचा अर्थ कळतो का ? असा प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना विचारला आहे.

Know the meaning of sedition charges? - Delhi High Court | देशद्रोहाच्या आरोपाचा अर्थ कळतो ? - दिल्ली उच्च न्यायालय

देशद्रोहाच्या आरोपाचा अर्थ कळतो ? - दिल्ली उच्च न्यायालय

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १-  तुम्हाला देशद्रोहाच्या आरोपाचा अर्थ कळतो का ? असा प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी कन्हैया कुमारच्या जामिन अर्जाच्या याचिकेवर सुनावणी करताना थेट दिल्ली पोलिसांना विचारला. 
उच्च न्यायालयाने थेट हा प्रश्न विचारल्याने दिल्ली पोलिसांची पंचाईत झाली. कन्हैया कुमार देशविरोधी घोषणा देत असल्याचा कोणताही व्हिडीओ नसल्याची दिल्ली पोलिसांनी न्यायालयासमोर कबुली दिली. 
कन्हैयाच्या जामिन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला असून, उद्या न्यायालय यावर निकाल देण्याची शक्यता आहे. बाहेरच्या लोकांनी जर कॅम्पसमध्ये येऊन देशविरोधी घोषणा दिल्या असतील तर त्यासाठी कन्हैया कुमार विरोधात देशद्रोहाचा गुन्हा का दाखल केला ? असा प्रश्न न्यायालयाने दिल्ली पोलिसांना विचारला आहे. 
 

Web Title: Know the meaning of sedition charges? - Delhi High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.