कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आता केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्षाचं केंद्र झाली आहे. शारदा घोटाळ्यावरुन या संपूर्ण संघर्षाला सुरू झाली. शारदा चिट फंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम काल कोलकात्यात पोहोचली. कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. यानंतर पश्चिम बंगालमध्ये रणकंदन सुरू झालं. शारदा चिट फंड घोटाळ्यामुळे मोदी विरुद्ध दिदी हा वाद सुरू झाला. 2500 कोटींचा हा घोटाळा 2013 मध्ये उघडकीस आला. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये रोज व्हॅली स्कीममध्येही घोटाळा झाला आहे. हादेखील चिट फंड घोटाळा असून तो जवळपास 17000 कोटींचा आहे. या दोन्ही घोटाळ्यामागे तृणमूलच्या बड्या नेत्यांचा हात असल्याचे धागेदोरे समोर आले आहेत. या दोन्ही घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडून सुरू आहे. या प्रकरणात सीबीआयनं माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम यांच्या विरोधात 11 जानेवारीला आरोपपत्र दाखल केलं.
शारदा घोटाळ्यामुळे मोदी-ममतांमध्ये तेढ; जाणून घ्या प्रकरणाबद्दल ए टू झेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 09:44 IST