शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मस्तच! टीव्ही सेट टॉप बॉक्सच्या बिलापासून मुक्तता होणार; आता 160 चॅनेल मोफत मिळणार, जाणून घ्या कसं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 18:07 IST

Free TV Channels : काहीजण वर्षांतून एकदा तर काही दर महिन्याला न चुकता टीव्हीचा रिचार्ज करतात. मात्र आता या रिचार्जपासून सुटका करून घ्यायची असेल तर एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

नवी दिल्ली - ग्राहकांना दर महिना घरी टीव्हीसाठी सेट टॉप बॉक्स रिचार्ज करावा लागतो. काहीजण वर्षांतून एकदा तर काही दर महिन्याला न चुकता टीव्हीचा रिचार्ज करतात. मात्र आता या रिचार्जपासून सुटका करून घ्यायची असेल तर एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. ग्राहकांनी सरकारी डीटीएच बॉक्सचा आधार घेता येणार आहे. ज्यामध्ये त्यांना कधीही रिचार्ज करावा लागणार नाही आणि कायमच मोफत टीव्ही चॅनेल पाहता येणार आहेत. 

प्रसार भारतीच्या डीडी फ्री डिशद्वारे ग्राहकांना रिचार्जपासून मुक्तता मिळू शकते. प्रसार भारतीचा सेट टॉप लावल्यानंतरही तुम्हाला 160 वाहिन्या पाहण्याची संधी मिळणार आहे. या सेट टॉप बॉक्ससाठी आपल्याला किती पैसे खर्च करावे लागतील आणि आपण स्वस्तात कसा याचा फायदा उचलू शकतो याची सर्व माहिती जाणून घेऊया...

डीडी फ्री डिश म्हणजे काय?

डीडी फ्री डिश प्रसार भारतीद्वारा संचालित डीटीएच सेवा आहे. डिसेंबर 2004 मध्ये ही लाँच केली गेली. यामध्ये ग्राहकाला सेट टॉप बॉक्सचा सेट मिळेल, ज्यासाठी आपल्याला एकदा पैसे द्यावे लागतील. एकदा तुम्ही पैसे दिल्यावर तुम्हाला त्याची सुविधा आयुष्यभर मिळते आणि तुम्हाला दरमहा किंवा वर्षाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.

किती चॅनेल आहेत?

प्रसार भारतीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना यामध्ये 15 सामान्य करमणूक चॅनेल, 15 मूव्ही चॅनेल, 23 रिजनल चॅनेल, 51 एज्युकेशनल चॅनेल, 24 न्यूज चॅनेल, 6 म्युझिक चॅनेल, 3 भक्ती चॅनेल, 3 आंतरराष्ट्रीय चॅनेल पाहायला मिळतील. याद्वारे आपण थेट क्रिकेट, सुपरहिट गाणी, चित्रपट इत्यादींचा आनंद घेऊ शकता.

एकाच वेळी किती रुपये द्यावे लागतील?

जर तुम्हाला डीडी फ्री डिश मिळवायची असेल तर एक वेळ सेट खरेदी करावा लागेल. आपण बाजारात कोठूनही डीडी फ्री डिश सेट टॉप बॉक्स आणि डिश खरेदी करू शकता. या संपूर्ण सेटसाठी तुम्हाला 2000 रुपयांपर्यंत खर्च करावा लागू शकतो. फक्त हा आपला एक वेळचा खर्च असेल आणि त्यानंतर आपल्याला दरमहिना कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.

कुठेही घेऊन जाता येणार?

ग्राहकांनी जर कोणत्याही कारणास्तव आपलं घर बदलल्यास ते हा बॉक्स इतरत्र सहजपणे इन्स्टॉल करू शकतात. यासाठी कोणत्याही इन्स्टॉलरच्या मदतीने आपण एका घरापासून दुसर्‍या घरात शिफ्ट करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे. 

 

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनIndiaभारत