शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
4
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
7
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
10
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
11
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
12
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
13
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
14
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
15
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
16
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
17
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
18
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
19
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
20
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा

...यामुळे पंतप्रधान मोदींनी निवडली होती टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यासाठी 5 वाजताची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 18:26 IST

ज्योतिष शास्त्रानुसार, नऊ ग्रहांपैकी राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तीचा कारक मानला जातो. गंभीर आजार किंवा साथीचे आजार पसरवणारे विषाणू हे राहू आणि शनिच्या  प्रभावाखाली असतात. विषाणूंमुळे हवा दूषित होते.

ठळक मुद्देज्योतीशशास्त्राप्रमाणे 22 मार्चला सायंकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत राहुकाळ होता 22 मार्चला शततारका नक्षत्रही आहे, या नक्षत्राचा स्वामी राहू आहे  राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तीचा कारक मानला जातो 

मुंबई - जनता कर्फ्यूदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या आणि थाळ्या वाजविण्यासाठी 22 मार्चचा सायंकाळी पाज वाजताचा मुहूर्त निवडला होता. मोदींनी हाच मुहूर्त का निवडला? असा प्रश्नही अनेकांना पडला होता. तर चला जाणून घेऊया, पंतप्रधान मोदींनी हीच वेळ का निडवडली असावी.  

ज्योतिष शास्त्रानुसार, नऊ ग्रहांपैकी राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तीचा कारक मानला जातो. गंभीर आजार किंवा साथीचे आजार पसरवणारे विषाणू हे राहू आणि शनिच्या  प्रभावाखाली असतात. विषाणूंमुळे हवा दूषित होते. आज 22 तारीख आहे. याचा अर्थ 2+2 = 4, 4 हा राहुचा अंक आहे. तसेच 22 मार्चला शततारका नक्षत्रही आहे. या नक्षत्राचा स्वामी राहू आहे. अशी 'कुंडली' ज्योतिष अभ्यासक आचार्य डॉ. ज्योतिवर्धन साहनी यांनी मांडली आहे. 

ज्योतीशशास्त्राप्रमाणे 22 मार्चला सायंकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत राहुकाळ होता. या काळात वातावरणातील विषाणू हटविण्यासाठी शंखनाद आणि घंटानाद केला जातो. याकडेही डॉ. साहनी यांनी लक्ष वेधले. यापार्श्वभूमीवरच कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि राष्ट्ररक्षकांना दाद देण्यासाठी सायंकाळी 5 वाजता टाळ्या, घंटानाद आणि थाळ्या वाजवण्याची साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिली असावी.

ज्योतिषशास्त्र मानायचे की नाही, हा शेवटी ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. या सगळ्या मांडणीनुसार, कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना हे शास्त्र पटत नाही, त्यांनी या मांडणीचा विचार करू नये. मात्र, गर्दी टाळणे, अधिक माणसांच्या संपर्कात न येणे, हेच कोरोना संसर्ग रोखण्याचे प्रभावी माध्यम आहे. हे वास्तव प्रत्येकालाच मान्य करावे लागेल. त्यामुळे पुढचे काही दिवस काम असेल तरच बाहेर पडा, हे सर्व नेत्यांचे आणि यंत्रणांचे आवाहन प्रत्येकाने ऐकणे, आवश्यक आहे.

देशात आतापर्यंत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील जवळपास 170 हून अधिक देशांतील 3,05,046 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 13 हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.