चाकूचा धाक दाखवून लुटले
By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:51+5:302015-01-30T21:11:51+5:30
चाकूचा धाक दाखवून लुटले

चाकूचा धाक दाखवून लुटले
च कूचा धाक दाखवून लुटलेनागपूर : काम आटोपून घरी जात असलेल्या व्यक्तीला चार आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील ५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री १२.१० वाजताच्या सुमारास घडली. मुकेश शिवपाल दमादे (२४) रा. नागेश्वरनगर हे एम्प्रेस मॉल येथील आपली ड्युटी संपवून घरी परत जात होते. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत विदर्भ आटा चक्कीजवळ बिडगाव रोड नागेश्वरनगर येथे दोन मोटारसायकलवर चार आरोपी त्यांच्याजवळ आले. त्यातील मोटारसायकल क्रमांक एम. एच. ३१, सीवाय-१०७१ वरील २० ते २५ वयोगटातील आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख तीन हजार ३००, कागदपत्रे, २ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकून ५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.