शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

CAA : किसी के बाप का हिंदुस्थान थोडी है... विरोधकांच्या शायरीला परेश रावलांचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 12:44 IST

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

नवी दिल्ली - देशात सीएए आणि एनआरसी विरोधी वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे, काँग्रेससह कम्युनिष्ट पक्षांकडून मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. सीएए कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये आंदोलन उभारले जात आहे. तसेच, हा कायदा संविधानाची पायमल्ली करणारा असल्याचं सांगत हा विरोध मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात संमिश्र बंद पाहायला मिळाला. सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध करत, मोदी सरकारचा निषेध या बंदच्या माध्यमातून नोंदविण्यात आला. सीएए आणि एनआरसीच्या वादात बॉलिवूडमधील काही सिनेतारकांनाही उडी घेतली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने जेएनयु हल्ल्यातील विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला होता. तर, नसरुद्द्दीन शहा यांनीही सीएएला जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. त्यानंतर, भाजपा नेते अनुपम खेर यांनी नसरुद्दीन शहा यांच्यावर टीका केली होती.

आता, भाजपा नेते आणि अभिनेते परेश रावल यांनीही सीएए आणि एनआरसीचं समर्थन करताना, विरोध करणाऱ्या नागरिकांना टोला लगावला आहे. प्रजासत्ताकदिनी अनेकांनी राहत इंदौरी यांच्या शायरीचा उल्लेख करत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तो शेर शेअर केला होता. तसेच, अनेक आंदोलनातही तोच शेर ऐकवला जातो. आता, परेश रावल यांनी त्यावरुनच विरोधकांना लक्ष्य केलं आहे. सभी का खून है शामिल यहाँ की मिठ्ठी मेकिसी के बाप का हिंदुस्थान थोडी है !!या शायरीला उत्तर देताना परेश रावल यांनी टोला लगावला.  मित्रांनो, हिंदुस्थान तुमच्या वडिलांचा आहे, हे तुम्हाला सिद्ध करायचं नाही. तर, तुमचे वडिल हिंदुस्थानचे आहेत, हेच तुम्हाला सिद्ध करायचंय, असे रावल यांनी म्हटलंय.  

टॅग्स :Paresh Rawalपरेश रावलcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलनTwitterट्विटर