भितीने पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रवेशद्वार केले बंद किशोर चौधरी खून प्रकरण : अधीक्षक कार्यालयात आणला जाणार होता मृतदेह; आरोपींची संख्या पोहचली १४
By Admin | Updated: March 11, 2016 22:26 IST2016-03-11T22:26:45+5:302016-03-11T22:26:45+5:30
जळगाव : सागर चौधरी याचा भाऊ किशोर मोतीलाल चौधरी (रा.चौघुले प्लॉट,जळगाव) यांच्यावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता महानुभाव पंथाच्या विधीनुसार शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी किशोर यांचा मृतदेह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळताच भीतीने पोलीस अधीक्षक कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ पोलीस दलावर आली होती. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

भितीने पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रवेशद्वार केले बंद किशोर चौधरी खून प्रकरण : अधीक्षक कार्यालयात आणला जाणार होता मृतदेह; आरोपींची संख्या पोहचली १४
ज गाव : सागर चौधरी याचा भाऊ किशोर मोतीलाल चौधरी (रा.चौघुले प्लॉट,जळगाव) यांच्यावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता महानुभाव पंथाच्या विधीनुसार शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी किशोर यांचा मृतदेह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळताच भीतीने पोलीस अधीक्षक कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ पोलीस दलावर आली होती. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सागर चौधरीचे निवासस्थान व प्रजापत नगरातील स्मशानभूमीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजता किरकोळ वादातून किशोर चौधरीवर सुरेश दत्तात्रय सोनवणे व उमेश कांडेलकर यांनी बर्फ फोडण्याच्या टोचाने हल्ला केला होता. यात उपचार सुरूअसताना त्याचा मृत्यू झाला होता. इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री सव्वा बारा वाजता किशोरचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातून धुळे येथे नेण्यात आला होता.इन्फो-धुळ्यात मृतदेह घेण्यास नकारधुळे येथे सकाळी दहा ते अकरा या वेळेत इनकॅमेरा शवविच्छेदन झाल्यानंतर सागर चौधरी यांनी मृतदेह घेण्यास नकार दिला, ही बाब धुळे येथे गेलेल्या पोलीस कर्मचार्यांची शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक आत्माराम प्रधान यांना भ्रमणद्धनीवरुन कळवली, त्यानुसार प्रधान यांनी सागरशी संपर्क साधून मृतदेहाची विटंबना होवू शकते, पोलीस तपासात कमी पडलेले नाहीत व पुढेही कमी पडणार नाहीत असे सांगून मृतदेह घेण्याची विनंती केली. तरीही नातेवाईक अडून बसल्याने या प्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल होवू शकतो, याची कल्पना दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. एस.पी.कार्यालयाचे प्रवेशद्वार केले बंदधुळे येथून साडे अकरा वाजता मृतदेह घेवून येणारी गाडी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात आणली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी अधिकार्यांची बैठक बोलावल्याने नवा वाद होवू शकतो, या भीतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात चे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. तसेच तेथे येणारे सर्व अंतर्गत व उपरस्त्यावर तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरचे निरीक्षक नवलनाथ तांबे, जिल्हा पेठचे शाम तरवाडकर व वाहतूक शाखेचे चंद्रकांत सरोदे यांच्यावर ही जबाबदारी निित करण्यात आली होती.