काश्मीरमध्ये लष्करी अधिका-याचे अपहरण करुन केली हत्या
By Admin | Updated: May 10, 2017 08:45 IST2017-05-10T08:45:30+5:302017-05-10T08:45:30+5:30
जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात बुधवारी सकाळी एका लष्करी अधिका-याचा मृतदेह सापडला.

काश्मीरमध्ये लष्करी अधिका-याचे अपहरण करुन केली हत्या
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 10 - जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात बुधवारी सकाळी एका लष्करी अधिका-याचा मृतदेह सापडला. उमर फय्याझ असे या अधिका-याचे नाव आहे. दहशतवाद्यांनी गोळया झाडून या लष्करी अधिका-याची हत्या केली. उमर नुकतेच लष्करामध्ये भरती झाले होते.
उमर मंगळवारी रात्री एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी कुलगाम येथे गेले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले अशी माहिती पोलिसांनी दिली. मागच्या आठवडयात शोपियनमध्ये लष्करी पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये एका नागरीकाचा मृत्यू झाला तर, दोन जवान जखमी झाले होते.
शोपियन जिल्ह्यातील गावांमध्ये सध्या मोठया प्रमाणावर दहशतवादविरोधी मोहिम राबवली जात आहे. शोपियनमध्ये जवानांवर झालेले हल्ले आणि अनेक दहशतवादी मोकाट फिरत असल्याचे व्हिडीओमधून समोर आल्यानंतर लष्कराने शोपियनमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरु केली आहे.