किसिंग बाबाला अटक, मनोरुग्णालयात रवानगी

By Admin | Updated: December 27, 2014 18:55 IST2014-12-27T18:55:05+5:302014-12-27T18:55:05+5:30

हैदराबाद - आपण देवाचे दूत असून, आपल्या आलिंगन व चुंबनाने भक्तांचे आर्थिक व कौटुंबिक प्रश्न सुटतात, असा दावा करणाऱ्या बाबाला प्रोद्दातूर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. किसिंग बाबा या नावाने ओळखला जाणारा हा बाबा आपल्या आजारी भक्तांना आलिंगन व चुंबन देऊन गेल्या दोन महिन्यांपासून बरे करण्याचे काम करीत होता. येथील अय्यपा मंदिरामागे घेतलेल्या एका खोलीत त्याचे हे काम सुरू होते. त्याची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी त्याच्या खोलीवर धाड घातली व त्याला अटक केली. त्याला कमलापुरमच्या न्यायालयात दाखल केले व नंतर त्याला कडप्पाच्या मनोरुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी त्याच्या अनुयायांनाही अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Kishen Baba arrested, sent to psychiatric hospital | किसिंग बाबाला अटक, मनोरुग्णालयात रवानगी

किसिंग बाबाला अटक, मनोरुग्णालयात रवानगी

दराबाद - आपण देवाचे दूत असून, आपल्या आलिंगन व चुंबनाने भक्तांचे आर्थिक व कौटुंबिक प्रश्न सुटतात, असा दावा करणाऱ्या बाबाला प्रोद्दातूर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. किसिंग बाबा या नावाने ओळखला जाणारा हा बाबा आपल्या आजारी भक्तांना आलिंगन व चुंबन देऊन गेल्या दोन महिन्यांपासून बरे करण्याचे काम करीत होता. येथील अय्यपा मंदिरामागे घेतलेल्या एका खोलीत त्याचे हे काम सुरू होते. त्याची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी त्याच्या खोलीवर धाड घातली व त्याला अटक केली. त्याला कमलापुरमच्या न्यायालयात दाखल केले व नंतर त्याला कडप्पाच्या मनोरुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी त्याच्या अनुयायांनाही अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Kishen Baba arrested, sent to psychiatric hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.