शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kisan Kranti Padyatra: राजनाथ सिंहांची शिष्टाई; शेतकऱ्यांच्या चार मागण्या मोदी सरकारकडून मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 16:22 IST

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी साधला संवाद

नवी दिल्ली: आपल्या विविध मागण्यांसाठी हरिद्वारहून सुरू झालेली हजारो शेतकऱ्यांची पदयात्रा दिल्लीच्या सीमेवर पोहोचली आहे. भारतीय किसान युनियनच्या वतीनं या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी शेतकरी आणि पोलीस आमने-सामने आले. पोलिसांनी लाठीमार केल्यानं परिस्थिती काही वेळासाठी तणावपूर्ण झाली होती. यानंतर मोदी सरकारकडून गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यामध्ये सरकारनं शेतकऱ्यांच्या चार मागण्या केल्या. शेतकऱ्यांची पदयात्रा रोखण्यासाठी उत्तर प्रदेश-दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं. त्यामुळे याठिकाणी शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्यादेखील फोडल्या. यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या सरकारला मान्य असल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. सरकारनं आमच्या 4 महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याची माहिती भारतीय किसान युनियनचे महासचिव युद्धवीर सिंह यांनी प्रसारमाध्यमांना दिली. शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांना 5 टक्केच जीएसटी लावण्यात यावा, डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टर्सवर राष्ट्रीय हरित लवादानं लादलेले निर्बंध हटवण्यात यावे या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादनाची कमी दरानं होणारी विक्री रोखण्यासाठी कायदा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे. पीक विम्याबद्दलची शेतकऱ्यांची मागणीदेखील सरकारनं मान्य केली आहे. मात्र स्वामिनाथन आयोगाच्या अहवालातील शिफारशींची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याबद्दल अद्याप एकमत होऊ शकलेलं नाही. 

टॅग्स :FarmerशेतकरीRajnath Singhराजनाथ सिंहNarendra Modiनरेंद्र मोदी