किर्ती आझाद भाजपमधून निलंबित
By Admin | Updated: December 23, 2015 18:34 IST2015-12-23T18:34:34+5:302015-12-23T18:34:34+5:30
दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचारावरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना जाहीरपणे लक्ष्य करणारे भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांना भाजपतून निलंबित करण्यात आले आहे.

किर्ती आझाद भाजपमधून निलंबित
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचारावरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना जाहीरपणे लक्ष्य करणारे भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांना भाजपतून निलंबित करण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी पत्रकारपरिषद घेऊन आझाद यांनी डीडीसीएतील कथित भ्रष्टाचारावरुन अरुण जेटली यांना लक्ष्य केले होते.
या पत्रकारपरिषदेपूर्वी त्यांना मर्यादा न ओलांडण्याच्या पक्षश्रेष्ठींकडून इशारा देण्यात आला होता. जेटली यांनीही रविवारी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत किर्ती आझाद यांचे नाव न घेता एका खासदाराने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेऊन मला अडकवण्याची रणनिती बनवली होती असा आरोप केला होता. त्यांचा इशारा किर्ती आझाद यांच्याकडे होता.