मुख्य पान १ साठी सुधारीत जळगावात दोन मुलींची छेडखानी विनयभंग करणार्‍या किरण साळुंखे यास अटक : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:03+5:302014-12-23T00:04:03+5:30

Kiran Salunkhe arrested for allegedly molesting two girls in Jalgaon for upgrading home-1: Arrested for motivation for suicide | मुख्य पान १ साठी सुधारीत जळगावात दोन मुलींची छेडखानी विनयभंग करणार्‍या किरण साळुंखे यास अटक : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

मुख्य पान १ साठी सुधारीत जळगावात दोन मुलींची छेडखानी विनयभंग करणार्‍या किरण साळुंखे यास अटक : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

>
सोबत फोटो- कुणाल साळुंखे- २३ सीटीआर ९८

जळगाव- दोन दिवसापूर्वीच मुलीच्या छेडखानीमुळे शहरात एका पित्याचा बळी गेला असताना सोमवारी तब्बल दोन मुलींची छेड काढण्याचे प्रकार घडले़ तर तिसर्‍या घटनेत एका मुलीला त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दिवसागणिक विनयभंगचे प्रकार घडत असल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही? असा संतप्त सवाल पालक वर्गाकडून उपस्थित होत आहे.

१. पुष्पावती खुशाल गुळवे विद्यालयात इयत्ता ९ वीत शिकणार्‍या निमखेडी येथील विद्यार्थिनीला रिक्षाचे भाडे न घेता अश्लील वर्तन करुन त्रास देणारा रिक्षा चालक फारूख पिंजारी,रा़हुडको पिंप्राळा याला मुलीच्या वडीलांनी चांगलाच इंगा दाखविला़ याप्रकरणी फारुख पिंजारी व त्याचा साथीदार फरीद रहीम पटेल या दोघांविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला विनयभंग व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

२. ॲड़बबनराव बाहेती महाविद्यालयात शिकणार्‍या निमखेडीतील १२ वीच्या विद्यार्थिनीचा गेल्या सहा महिन्यांपासून पाठलाग करून अश्लील चाळे करणार्‍या सद्दाम शाह माजिद शाह(२०)रा़तांबापुरा याच्याविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे़

३. गजाजन कॉलनीतही एका मुलीला त्रास देणार्‍या पवन रवींद्र लोखंडे या युवकास पोलिसांनी ताब्यात घेवून त्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.


इन्फो-
अखेर कुणाल साळुंखे यास अटक
विनयभंग प्रकरणातील आरोपी कुणाल हेमंत साळुंखे याच्याविरूध्द सुनील सोनवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुपारी शिवतीर्थ मैदानावरून त्यास अटक करण्यात आली़ त्याने विनयंभग केल्याने पोलिसात गुन्हा दाखल झाला होता तसेच साळुंखे कुटुंबाने सोनवणेंविरुद्ध परस्पर विरोधी तक्रार दिली होती. या घटनेमुळे सुनील सोनवणे यांनी बदनामीच्या भीतीने शनिवारी रेल्वे खाली आत्महत्या केली होती.

Web Title: Kiran Salunkhe arrested for allegedly molesting two girls in Jalgaon for upgrading home-1: Arrested for motivation for suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.