किरण बेदी यांचा भाजपामध्ये प्रवेश

By Admin | Updated: January 15, 2015 18:46 IST2015-01-15T16:35:03+5:302015-01-15T18:46:18+5:30

माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला.

Kiran Bedi's entry into BJP | किरण बेदी यांचा भाजपामध्ये प्रवेश

किरण बेदी यांचा भाजपामध्ये प्रवेश

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत बेदी यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला असून यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली हे सुध्दा उपस्थित होते.
अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणा-या किरण बेदी यांचे केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्या भाजपामध्ये जातील असे बोलले जात होते. किरण बेदी यांनी याआधीही भाजपाचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले आहे. किरण बेदी यांच्या भाजपप्रवेशाने भाजपाला अजून बळकटी मिळेल असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला तर बेदी यांचे भाजपामध्ये स्वागत असल्याचे जेटली यावेळी म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर किरण बेदी निवडणूक लढविणार आहेत मात्र त्या कोणत्या मतदारसंघातून लढतील ते स्पष्ट करणे अमित शाह यांनी टाळले. 

Web Title: Kiran Bedi's entry into BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.