किरण बेदी यांच्याजवळ ११.६५ कोटींची मालमत्ता पाच ग्रॅम सोने आणि मारुती ८०० गाडी
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:31+5:302015-01-22T00:07:31+5:30
नवी दिल्ली-दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या भाजपाच्या उमेदवार किरण बेदी यांनी त्यांच्या व त्यांच्या पतीजवळची मिळून ११.६५ कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे. कृष्णानगर जागेकरिता निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बेदी यांनी त्यांच्याविरुद्ध कुठल्याही न्यायालयात कोणतेही प्रकरण प्रलंबित नसल्याचे नमूद केले आहे.

किरण बेदी यांच्याजवळ ११.६५ कोटींची मालमत्ता पाच ग्रॅम सोने आणि मारुती ८०० गाडी
न ी दिल्ली-दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या भाजपाच्या उमेदवार किरण बेदी यांनी त्यांच्या व त्यांच्या पतीजवळची मिळून ११.६५ कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे. कृष्णानगर जागेकरिता निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बेदी यांनी त्यांच्याविरुद्ध कुठल्याही न्यायालयात कोणतेही प्रकरण प्रलंबित नसल्याचे नमूद केले आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्याजवळ ११ कोटींची तर त्यांच्या पतीजवळ ६१ लाखांची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. यात पाच ग्रॅम सोन्याचा व मारुती ८०० या गाडीचा समावेश आहे. दिल्लीजवळील द्वारका व उदय पार्क येथे तसेच उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगरात एक-एक सदनिका असून त्यांची एकूण किंमत सहा कोटी रुपये आहे. पुणे व गुडगावात किरण बेदी यांच्या नावाने शेतजमीन असून अमृतसरजवळ त्यांच्या पतीच्या नावाने शेतजमीन आहे असे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.