कृष्णानगर मतदारसंघातून किरण बेदी यांचा अर्ज दाखल
By Admin | Updated: January 22, 2015 00:06 IST2015-01-22T00:06:52+5:302015-01-22T00:06:52+5:30
नवी दिल्ली- पूर्व दिल्लीतील कृष्णानगर विधानसभा मतदारसंघातून, भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाच्या परंपरागत जागेवरून लढत असल्याने आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढली असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

कृष्णानगर मतदारसंघातून किरण बेदी यांचा अर्ज दाखल
न ी दिल्ली- पूर्व दिल्लीतील कृष्णानगर विधानसभा मतदारसंघातून, भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाच्या परंपरागत जागेवरून लढत असल्याने आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढली असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन,भाजपाचे दिल्ली विभाग प्रमुख सतीश उपाध्याय, विजय गोयल व महेश गिरी यांच्यासह अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी १२ वाजता जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बेदी पोहचल्या. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी भाजपाने कृष्णानगरात बरेच काम केले आहे व ते डॉ. हर्षवर्धन यांच्या कठोर परिश्रमाचेच फळ आहे असे नमूद केले.