किरण बेदी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार
By Admin | Updated: January 20, 2015 10:44 IST2015-01-19T23:02:56+5:302015-01-20T10:44:29+5:30
माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी या भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली.

किरण बेदी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी या भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. किरण बेदी या दिल्लीच्या कृष्णानगरमधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती शाह यांनी योवळी दिली. आज भाजपची निवडणूक समितीची बैठकीत पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले. बेदी यांनी चार दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला होता. किरण बेदी यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केत्याने आता दिल्लीत थेट किरण बेदी विरुध्द अरविंद केजरीवाल असा सामना पाहायला मिळणार आहे.