शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

किंगफिशर एअरलाइन्स प्रकरणात विजय माल्याविरोधात पुन्हा एकदा अटक वॉरंट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 13:58 IST

बँकांचे 9 हजार कोटी बुडवून फरार झालेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय माल्याविरोधात पुन्हा एकदा अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली- बँकांचे 9 हजार कोटी बुडवून फरार झालेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय माल्याविरोधात पुन्हा एकदा अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. बंगळुरूतल्या एका विशेष न्यायालयानं विजय माल्यासह 18 लोकांना अटक वॉरंट बजावलं आहे. विजय माल्यानं फसवणूक केल्याची तक्रार एसएफआयओनं केली होती. त्यानंतर चौकशी केली असता, किंगफिशर एअरलाइन्सच्या संबंधित प्रकरणात अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं आहे. न्यायालयाच्या एका दस्तावेजानुसार, कंपनी कायद्यांतर्गत विजय माल्या आणि 18 लोकांविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आलं आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी तब्बल 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून देश सोडून गेलेल्या विजय माल्याने बँकांसोबत सेटलमेंट करण्याची तयारी दाखवली होती. ट्विट करून त्याने बँकांसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. सार्वजनिक बँकांमध्ये एकाच वेळी सर्व कर्ज फेडण्याची तरतूद आहे. शेकडो कर्जदारांनी या नियमांतर्गत कर्ज फेडले आहे. मग मला असं करण्यापासून का रोखलं जात आहे, असा सवाल त्यांनी विचारला होता.या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची मागणीही माल्याने केली. याशिवाय त्यांनी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यावर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयात रोहतगी यांनी नोंदवलेल्या सर्व जबाबावरून ते माझ्याविरोधात आहेत हे स्पष्ट होतं असं ते म्हणाले होते. आमच्या प्रस्तावावर विचार न करता तो फेटाळण्यात आला, मी योग्य पद्धतीने चर्चा करण्यास तयार आहे असं ट्विट माल्याने केलं होतं.

विजय माल्याच्या बुडीत कर्ज प्रकरणात सीबीआयनं किंगफिशरचे 4 अधिकारी आणि आयडीबीआय बँकेच्या चार माजी अधिका-यांना अटक केली होती. विशेष म्हणजे अटक झालेल्यांमध्ये आयडीबीआय बँकेच्या माजी अध्यक्षांचाही समावेश होता. किंगफिशरचे माजी व्यवस्थापकीय संचालक योगेश अग्रवाल आणि आयडीबीआय बँकेचे उप व्यवस्थापकीय संचालक बी. के. बत्रा यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती 'पीटीआय'ने दिली होती. 

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याbankबँक