शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

दुष्मनाची पाणबुडी उडवू शकणारी ‘किल्तान’ युद्धनौका नौदलात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 05:36 IST

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय नौदलाची आयएनएस किल्तान देशाला अर्पण व नौदलात दाखल केली. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची ताकत अनेक पटीने वाढणार आहे.

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय नौदलाची आयएनएस किल्तान देशाला अर्पण व नौदलात दाखल केली. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची ताकत अनेक पटीने वाढणार आहे. खास पाणबुडीविरोधी तंत्रज्ञान हे किल्तानचे वैशिष्टय आहे. शिवालिक, कोलकत्ता क्लास वर्गातील युद्धनौकांनंतर कल्तान ही स्वदेशी बनावटीची युध्दनौका आहे.अत्याधुनिक शस्त्रसाठाहेवीवेट टॉर्पिडोज, एएसडब्ल्यू रॉकेटस, 76 एमएम कॅलिबर मिडियम रेंज गन, दोन 30 एमएम मल्टी बॅरल गन्स, फायर कंट्रोल सिस्टम आणि मिसाईल सिस्टमने आयएनएस सुसज्ज आहे तसेच किल्तानवर समुद्राच्या पोटात शोध घेणारे अत्याधुनिक सोनार आणि हवाई हालचालींवर लक्ष ठेवणाºया रेवती या दोन रडार यंत्रणा आहेत.डिझाईन येथेच केलेकार्बन फायबरचा वापर करुन बांधलेली ही पहिली भारतीय युद्धनौका आहे. कार्बन फायबरमुळे स्टेल्थ क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे शत्रूच्या रडारला चकवा देता येतो. त्यामुळे शत्रूच्या प्रदेशात घुसून हल्ला करणे सोपे होते. नौदलाच्या एका विभागाने आयएनएस किल्तानचे डिझाइन तयार केले. कोलकात्यातील गार्डन रिसर्च शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सने ती बांधली आहे.हे नाव कशामुळे दिले?किल्तान हे लक्षद्वीप बेटसमूहाचा भाग आहे. त्यामुळेच या युध्दनौकेला आयएनएस किल्तान नाव देण्यात आले आहे. दिल्लीपासून हे बेट1947 किलोमीटर अंतरावर आहे. त्या बेटाची लोकसंख्या 4041 इतकीच आहे. एके काळी पर्शियन आखाताहून श्रीलंके (सिलोन)कडे होणाºया आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मार्गातील हे बेट महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जात असे. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलIndiaभारतNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन