किसान रॅलीतच घेतली फाशी

By Admin | Updated: April 23, 2015 06:16 IST2015-04-23T06:16:17+5:302015-04-23T06:16:17+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमक्ष बुधवारी एका शेतकऱ्याने किसान रॅलीत आत्महत्या केली. मृत शेतकरी गजेंद्र सिंग हा राजस्थानच्या दौसाचा राहणारा

The killers were hanged in the rally | किसान रॅलीतच घेतली फाशी

किसान रॅलीतच घेतली फाशी

नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमक्ष बुधवारी एका शेतकऱ्याने किसान रॅलीत आत्महत्या केली. मृत शेतकरी गजेंद्र सिंग हा राजस्थानच्या दौसाचा राहणारा होता आणि आम आदमी पार्टीच्या (आप) किसान रॅलीत भाग घेण्यासाठी आला होता.
गजेंद्र सिंग याच्या आत्महत्येवरून राजकीय पक्षांमध्ये दिवसभर आरोप-प्रत्यारोप सुरू राहिले. या आत्महत्येसाठी ‘आप’ने भाजपा सरकारला जबाबदार धरले आहे, तर भाजपाने पलटवार करीत ‘आप’ला दोषी ठरविले आहे. दुसरीकडे काँग्रेसने आप आणि भाजपा या दोघांनाही लक्ष्य बनवित केंद्र आणि राज्य सरकारविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. परिश्रमी शेतकऱ्याने आपण एकटे आहोत असा विचार कधीही करू नये. भारतातील शेतकऱ्यांचा चांगला भविष्यकाळ घडविण्यासाठी आम्ही सर्व सोबत आहोत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर दिली.
शेतकरी आत्महत्या करीत असतानाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे भाषण ठोकत होते. महत्त्वाचे काय आहे, एखाद्याचा जीव की भाषण? आप नेत्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे. हा एक कट आहे. गजेंद्र सिंगने आत्महत्या केली हे माहीत असतानाही केजरीवाल भाषण देत राहिले, असा आरोप भाजपाचे प्रवक्ते सम्बित पात्रा यांनी केला.
‘आप’च्या रॅलीत शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच जबाबदार असल्याकारणाने या दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरुद्ध आत्महत्येस बाध्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे. या आत्महत्येसाठी मोदी आणि केजरीवाल हे दोघेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री आणि दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दिल्ली पोलीस केंद्राच्या अंतर्गत येतात. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारलाच जबाबदार धरले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रवक्ते सत्यव्रत चतुर्वेदी म्हणाले.
‘आप’च्या रॅलीत आत्महत्या करणाऱ्या राजस्थानच्या शेतकऱ्याला राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी श्रद्धांजली वाहिली. माझे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि शेतकऱ्यांचे कल्याण व उन्नतीसाठी कटिबद्ध आहे, असे राजे म्हणाल्या.
पंतप्रधान मोदी हे बडे उद्योगपती आणि मोठ्या धनिकांसाठीच आपले सरकार चालवित आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला. भूसंपादन वटहुकूम घाईगडबडीत जारी केल्याबद्दल केजरीवाल यांनी सरकारवर प्रहार केला.
ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मतांवरच सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आता त्याच शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. आता मोदी सरकारने एका वर्षातच शेतकऱ्यांचा विश्वास गमावला आहे. भूसंपादन विधेयकाला विरोध करीत हजारोंच्या संख्येत शेतकरी या रॅलीत येत आहेत. मोदी सरकार शेतकरीविरोधी आहे. हे केवळ मोदींच्या सभोवताल २४
तास फिरणाऱ्या बड्या धनिकांचे सरकार आहे. भूसंपादन वटहुकूम
पुन्हा जारी करण्याची एवढी घाई का केली, असा सवाल केजरीवाल यांनी मोदींना केला.

Web Title: The killers were hanged in the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.