कंटेनरच्या धडकेत एक ठार
By Admin | Updated: January 31, 2017 02:06 IST2017-01-31T02:06:43+5:302017-01-31T02:06:43+5:30
चांदेकसारे : कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर झगडेफाटा चौफुलीवर हॉटेल साईकृपासमोर मोटारसायकल व कंटेनरचा अपघात होऊन एकजण ठार व महिला जखमी झाली.

कंटेनरच्या धडकेत एक ठार
च ंदेकसारे : कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर झगडेफाटा चौफुलीवर हॉटेल साईकृपासमोर मोटारसायकल व कंटेनरचा अपघात होऊन एकजण ठार व महिला जखमी झाली.याबाबत समजलेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील देडेचांदवड येथील भिष्मा आबाजी बर्डे (वय ४६) हे आपल्या पत्नीसमवेत बजाज मोटारसायकलवर (एम.एच.१५ ए.वाय. १९१३) कोपरगावकडून देर्डे गावाकडे चालले होते. त्याचवेळी संगमनेरकडून कोपरगावकडे चाललेल्या कंटेनरने (क्र. यूके ०६ सीए. ६५५१) झगडेफाटा चौफुलीवर दुचाकीला धडक दिल्याने भिष्मा बर्डे जागीच ठार झाले. तर त्यांच्या पत्नी मंगल बर्डे जखमी झाल्या. पुढील तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे चांदेकसारेचे बीट हवालदार अर्जुन बाबर करत आहेत. (वार्ताहर)