शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 11:50 IST

Jharkhand Crime News: अनैतिक संबंधातून झालेल्या एका हत्येच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. रांची पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आशेश्वर महतो या तरुणाच्या हत्या प्रकरणात मृताच्या पत्नीलाच पोलिसांनी मुख्य आरोपी म्हणून अटक केली आहे.

अनैतिक संबंधातून झालेल्या एका हत्येच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. रांची पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आशेश्वर महतो या तरुणाच्या हत्या प्रकरणात मृताच्या पत्नीलाच पोलिसांनी मुख्य आरोपी म्हणून अटक केली आहे.

मृत आशेश्वर महतो याची पत्नी सीता देवी हिने २२ एप्रिल रोजी ओरमांझी पोलीस ठाण्यात पती आशेश्वर महतो हा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आशेश्वर याचा शोध सुरू केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आशेश्वर याचा मृतदेह सपाही नदीजवळ असलेल्या स्मशान घाटाजवळ सापडला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र या हत्याकांडाचं गुण उकललं तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. कारण आशेश्वर याची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर त्याच्या पत्नीनेच केल्याचं समोर आलं.

सीता हिने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. त्यानंतर भाओजीच्या मदतीने मृतदेह स्मशानाजवळ नेऊन टाकला. रांचीचे एसएसपी चंदन सिन्हा यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, या हत्येचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आलं होतं. तसेच तांत्रिक समितीचीही मदत घेण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना छापेमारी करून ओरमांझीमधील डहू गावात धाड टाकून तिन्ही आरोपींना अटक केली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या ठिकाणांहून हत्येसाठी वापरण्यात आलेली हातोडी आणि कुऱ्हाडीसह इतर सामान जप्त करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे आसेश्वर याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह दिवसभर घरात लपवून ठेवला. तसेच खोलीला कुलूप लावून सीता तिचा प्रियकर सनोज महतो याच्यासोबत निघून गेली. त्यानंतर रात्री सीता आणि तिच्या प्रियकराने प्रेमनाश महतोसोबत मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंड