हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:25+5:302015-02-15T22:36:25+5:30

नागपूर : एका तरुणाची निर्दयपणे हत्या करून मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना नंदनवनमध्ये आज सकाळी उघडकीस आली. यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे.

Killed the body in the gutter and killed | हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला

हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला

गपूर : एका तरुणाची निर्दयपणे हत्या करून मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना नंदनवनमध्ये आज सकाळी उघडकीस आली. यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे.
नंदनवनमधील तुळशीनगरात रेल्वेलाईनच्या बाजूला एक नाला आहे. आज सकाळी या नाल्याकडे प्रातर्विधीसाठी गेलेल्या मंडळींना एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्यांनी पोलिसांना सूचना दिली. नंदनवन पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. मृतदेह विवस्त्र होता. त्याची ओळख पटलेली नाही.
पन्नासावर घाव
मृत तरुण ३० ते ३५ वयोगटातील असून, मारेकऱ्याने गुप्तीसारख्या शस्त्राने त्याच्या शरीरावर पन्नासपेक्षा जास्त घाव घातले. कट्टर शत्रूसारखा त्याला ठार मारला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मृताची ओळख पटवण्याचे आणि आरोपींना शोधण्याचे काम नंदनवन पोलीस करीत आहेत.
----

Web Title: Killed the body in the gutter and killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.