श्रीनगर: जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. दहशतवाद्यांनी पोलीस, जवान यांच्याऐवजी भ्रष्ट राजकीय नेत्यांच्या हत्या कराव्यात, असं वक्तव्य मलिक यांनी केलं. कारगिलवरील भाषणादरम्यान त्यांनी हे विधान केलं. 'ही मुलं (दहशतवादी) विनाकारण आपल्या माणसांना मारतात. पीएसओ, एसडीओंच्या हत्या करतात. त्यांना तुम्ही का मारताय? त्यापेक्षा ज्यांनी तुमचा देश लुटला त्यांना मारा. ज्यांनी काश्मीरमधील संपत्ती लुटली, त्यांचा खात्मा करा. अशांपैकी एकाला तरी तुम्ही मारलंय का? बंदूक हातात घेऊन काहीही साध्य होणार नाही,' असं सत्यपाल सिंह म्हणाले.
'दहशतवाद्यांनो, जवानांना मारण्यापेक्षा काश्मीर लुटणाऱ्यांना ठार करा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 22:00 IST