भाविकांना खिचडीचे वाटप

By Admin | Updated: September 8, 2015 15:42 IST2015-09-08T15:42:24+5:302015-09-08T15:42:24+5:30

सोनई : श्रावणानिमित्त येथील राजस्थानी युवा मंचतर्फे शनि शिंगणापूरला पायी जाणार्‍या भाविकांना चहा व साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी मुकेश भळगट, महावीर चोपडा, रितेश गुंदेचा, गौरव बंब, सुहास सिकची हजर होते.

Khichadi allotment to the devotees | भाविकांना खिचडीचे वाटप

भाविकांना खिचडीचे वाटप

नई : श्रावणानिमित्त येथील राजस्थानी युवा मंचतर्फे शनि शिंगणापूरला पायी जाणार्‍या भाविकांना चहा व साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी मुकेश भळगट, महावीर चोपडा, रितेश गुंदेचा, गौरव बंब, सुहास सिकची हजर होते.
जन्मोत्सव साजरा
चिचोंडी पाटील : सद्गुरु गणेशनाथ महाराज संजीवन समाधी, औसा व चिचोंडीपाटील ग्रामस्थांतर्फे गणेशनाथ महाराजांचा जन्मोत्सव साजरा झाला. पहाटे बाबांच्या समाधीस्थानाला अभिषेक करण्यात आला.
कांदा आवक
घोडेगाव : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव बाजारातर रविवारी कांदा आवकमध्ये घट झाली. जास्तीत जास्त भाव ५ हजार ३०० रुपयांपर्यंत निघाले. एक नंबर कांद्याला ४ हजार ते ५ हजार ३०० रुपये भाव मिळाला.
अध्यक्षपदी शिंदे
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुका अधिकृत महा-ई-सेवा केंद्र असो.च्या अध्यक्षपदी सतीश शिंदे, उपाध्यक्षपदी शिवाजी देवखिळे यांची निवड करण्यात आली. इतर पदाधिकारी - कार्याध्यक्ष अप्पासाहेब राऊत, किरण नलगे खजिनदार, राजेंद्र राऊत सचिव, सल्लागार बाळासाहेब काकडे, सुनील राऊत, सदस्य अनिकेत बोरुडे, मिनीनाथ इथापे.
पवार यांचा सत्कार
शेवगाव : गुरुमाऊली मंडळ व प्राथमिक शिक्षक संघातर्फे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक अशोक पवार यांचा मंडळाचे तालुकाध्यक्ष रुस्तुम दौंड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नवनाथ भापकर, युसूफ शेख व इतर मान्यवर हजर होते.
सप्ताहाची सांगता
शेवगाव : तालुक्यातील हातगाव येथे श्री नबाजी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सोमवारी सांगता झाली. सप्ताहकालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सप्ताहामुळे हातगाव भक्तिमय झाले होते.
बसथांब्याचे लोकार्पण
पारनेर : तालुक्यातील तराळवाडी येथे उद्योजक हसन राजे यांनी उभारलेल्या बसथांब्याचे लोकार्पण माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ हजर होते.
नलिनी आवटी
श्रीरामपूर : तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथील नलिनी प्रभाकर आवटी (वय ८२) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पाटबंधारे खात्याचे सेवानिृत्त अधिकारी प्रभाकर आवटी यांच्या त्या पत्नी तर प्रगतशील शेतकरेी

सावित्रीबाई जगदाळे
अहमदनगर : बहिरवाडी ता. नगर येथील सावित्राबाई नानाभाऊ जगदाळे (वय ८०) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Khichadi allotment to the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.