शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणात आज खट्टर यांचा शपथविधी; दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्रीपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 00:33 IST

दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. भाजपचे ४०, जेजेपीचे १० व अपक्ष ६ अशा एकूण ५६ आमदारांचा आपणास पाठिंबा आहे.

बलवंत तक्षकचंदीगड : हरयाणात मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जननायक जनता पार्टीने (जेजेपी) जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आता खट्टर यांचा रविवारी मुख्यमंत्री म्हणून, तर दुष्यंत चौटाला यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी खट्टर यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे.

दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जेजेपीचे समर्थन मिळाल्यानंतर मनोहरलाल खट्टर यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी दावा दाखल केला. राज्यपालांनी त्यांना लगेचच सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. त्याआधी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेतेपदी खट्टर यांची एकमताने निवड करण्यात आली.नंतर मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले की, राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. देशभर दिवाळी साजरी होत असतानाच दुपारी सव्वादोन वाजता शपथविधी समारंभ होईल.

दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. भाजपचे ४०, जेजेपीचे १० व अपक्ष ६ अशा एकूण ५६ आमदारांचा आपणास पाठिंबा आहे. आपल्या सर्व समर्थक आमदारांसह आपण दावा दाखल केला होता, असे ते म्हणाले. खट्टर हे सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत. दुष्यंत यांच्या मातोश्री नयना चौटाला या राज्याच्या उपमुख्यमंत्री होऊ शकतात, असे आधी सांगण्यात आले होते. भद्रा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. त्यांच्या नावाची चर्चा होती. तथापि खट्टर यांनीच दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

टॅग्स :BJPभाजपाharyana election 2019हरियाणा निवडणूक