सनातन संस्थेचे खोटारडे आरोप - श्याम मानव

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:44+5:302014-12-18T00:40:44+5:30

नागपूर : सनातन संस्थांनी शासनाच्या पैशातून श्याम मानव समिती नास्तिकता पसरवीत आहे. हिंदू धर्माच्या संतावर टीका करीत असल्याचा आरोप केला होता. सनातन संस्थांचा हा आरोप खोटारडा असून त्यांनी पुरावा सादर करावा, असे आवाहन जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार-प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी पत्रपरिषदेत केले.

Khatardade allegations of Sanatan Sanstha - Shyam Manav | सनातन संस्थेचे खोटारडे आरोप - श्याम मानव

सनातन संस्थेचे खोटारडे आरोप - श्याम मानव

गपूर : सनातन संस्थांनी शासनाच्या पैशातून श्याम मानव समिती नास्तिकता पसरवीत आहे. हिंदू धर्माच्या संतावर टीका करीत असल्याचा आरोप केला होता. सनातन संस्थांचा हा आरोप खोटारडा असून त्यांनी पुरावा सादर करावा, असे आवाहन जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार-प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी पत्रपरिषदेत केले.
या समितीच्या माध्यमातून जादूटोणा कायद्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी घेतलेल्या सभांची सर्व रेकॉर्डिंग शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडे आहे. या सभेला पोलीससुद्धा उपस्थित असतात. शिवाय अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात संतांनी दिलेला उपदेश, त्यांचे अभंग या सभेच्या माध्यमातून सांगून कायद्याचा प्रचार आणि प्रसार करीत असतो. आमचा श्रद्धेला विरोध नाही, फक्त देवाच्या नावावर शोषण करणाऱ्यांचा आम्ही विरोध करीत असल्याचे श्याम मानव म्हणाले.
प्रचंड नुकसान होईल, या भीतीपोटी आचरा गावातील लोक तीन दिवस गाव सोडून जातात. या गावात अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते स्वत: गेले होते. गावकऱ्यांनी आम्हाला विरोधही केला नाही. आम्ही त्यांच्या श्रद्धेला तडा देण्यासाठी गेलो नव्हतो. त्यांच्यामध्ये देवाच्या नावावर असलेली भीती दूर करण्यासाठी गेलो होतो. तिथे जाऊन आमचा उद्देश सार्थकी लागला असल्याचे मानव म्हणाले.
शासनाने कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी राबविलेल्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, अतिशय यशस्वीपणे कार्यक्रमाची अंमलबजावणी होत आहे.

Web Title: Khatardade allegations of Sanatan Sanstha - Shyam Manav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.