खरीप करपला; उत्पादनात ४० टक्क्यांची घट

By Admin | Updated: September 8, 2015 15:42 IST2015-09-08T15:42:30+5:302015-09-08T15:42:30+5:30

वृत्तमालिका :- शेतक-यांचे जगण झालं कठीण

Kharip Karpala; Decrease in production by 40% | खरीप करपला; उत्पादनात ४० टक्क्यांची घट

खरीप करपला; उत्पादनात ४० टक्क्यांची घट

त्तमालिका :- शेतक-यांचे जगण झालं कठीण
पुणे: पावसाने ओढ दिल्याने हाताशी आलेले भात, बाजरी, भुईमुग, मुग ही खरीपाची पिक करपू लागली आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार परतीच्या पावसाकडून देखील फार अपेक्षा नाही. जिल्ह्यात पेरणी झालेल्या व शिल्लक राहिलेल्या खरीपाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांची घट होणार आहे.यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत सापला असून, आगामी काळात त्यांच जगण देखील कठीण होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून निर्सग मायबाप शेतक-यांची चांगलीच परीक्षा घेत आहे. गत वर्षी नोव्हेंबर २०१४ मध्ये झालेल्या आवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील हाताशी आलेले खरीपाचे पिक वाया गेले होते. खरीप वाया गेला तरी या पावसाचा रब्बी पिकांसाठी फायदा होईल म्हणून शेतक-यांनी उत्सहात रब्बी ज्वारी, हरभारा बाजरी, कांदा पिकाची लावगड केली. पण पुन्हा फेब्रुवारी व मार्च महिन्यात जिल्ह्यात जुन्नर, खेड आंबेगाव, शिरुर, इंदापूरत दौंड, बारामती या तालुक्यांमध्ये धुवाधार आवकाळी पाऊस व प्रचंड गारपीट झाली. त्यामुळे रब्बीचे पिकही वाय गेले. आवकाळी व गारपीटीवर मल्लमप˜ी म्हणून शासनाकडून तुंटपुजी रक्कम शेतक-यांना वाटण्यात आली. या संकटातून स्वत: सावरत पुन्हा खरीपाची तयारी करत आभाळाकडे डोळे लावून बसला. जुनच्या अखेरीच पावसाची चांगली सुरुवात झाल्याने शेतक-यांना घरात असले ते धान्य शेतात पेरून टाकले. जुनमध्ये संपूर्ण जिल्ह्यातच सर्वत्र चांगला पाऊस झाला. यामुळे प्रशासनकाडून देखील खरीपाची जय्यत तयारी करण्यात आली, शेतक-यांना बियाणे, खते व औषधाचा पुरवठा करण्यात आला. यामुळे वीस एक दिवसांतच जिल्ह्यात २ लाख ३० हजार हेक्टरपैकी तब्बल १ लाख ८३ हजार हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या करण्यात आल्या. परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने दडी दिली अन् शेतक-यांच्या अडचणीत वाढ झाली. जुलै, ऑगस्ट आणि आता स्पटेंबर महिना उजाडला तरी पावसाचा तपास नाही. जिल्ह्यातील धरणासाठ्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणी साठा आहे. त्यामुळे सध्या हाताशी आलेले भात, खरीप ज्वारी, बाजरी, मूग, भूईमूग ही खरीप पिके करपू लागली आहेत. धरणांमध्ये अत्यंत कमी पाणी साठा असल्याने सर्व पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसा अभावी शेतक-यांच्या डोळ्यासमोर पिके करपू लागली आहेत. सलग दोन वर्ष निर्सगाने शेतक-यांची परीक्षा पाहिल्याने मायबाप शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.
जिल्ह्यातील खरीप पिकांची परिस्थिती
जिल्ह्यात भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात सुमारे ६२ हजार २९४ हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली येत असून, जुनमध्ये झालेल्या पावसावर तब्बल ५४ हजार ६१८ हेक्टर क्षेत्रावर भाताची लावगड करण्यात आली. यामध्ये काही भात पोटरीच्या व काही फुटव्याच्या अवस्थेत आहे. परंतु पावसाने ओढ दिल्याने लावगड झालेल्या भाताच्या उत्पादनात १५ ते २० टक्के घट होण्याची शक्यता आहे. बाजरीच्या ७४ हजार १२५ हेक्टर क्षेत्रांपैकी ५५ टक्के म्हणजे ४० हजार ८१० हेक्टर शेत्रावर बाजरीचे पेरणी करण्यात आली. सध्या हे पिक दाणे भरण्याच्या आवस्थेत आहे. शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुगाचे क्षेत्र असून, जिल्ह्यात सरासरीच्या तीन प˜ १८ हजार २०० हेक्टर मुगाची लावगड करण्यात आली. हे पिक सध्या काढणीच्या अवस्थेत आहे. भुईमुगची ४० टक्के क्षेत्रावर १५ हजार ३६४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली. शेगा भरणेच्या स्थितीत आहेत. सोयाबीनचे क्षेत्र २ हजार ७०० हेक्टर असताना पावसाच्या ओढीमुळे यात वाढ होऊन १७ हजार ९९० हेक्टरवर सोयाबीनची लावगड करण्यात आली. एकूणच लावगड झालेल्या खरीपाच्या पिकांमध्ये पावसाने ओढ दिल्याने एकूण उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांची घट होणार आहे.

Web Title: Kharip Karpala; Decrease in production by 40%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.