शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगाम गेला वाया दुबार पेरणीचीही शक्यता मावळली: ८५ टक्के क्षेत्रावर पेरणी, बाजारपेठेतील उलाढाल मंदावली

By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST

शहाजी फुरडे-पाटील

शहाजी फुरडे-पाटील
बार्शी :
पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले तरी बार्शी तालुक्यात पावसाने हजेरी न लावल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्यातच जमा आहे़ याचा बाजारपेठेवरही परिणाम जाणवत आहे.
यंदा कांदलगाव, देवगाव, धसपिंपळगाव, मळेगाव, कारी, नारी, जामगाव, पिंपरी, सावरगाव या भागात पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली. त्यामुळे जून महिन्यातच काही शेतकर्‍यांनी सोयाबीन, तूर, कापूस, उडिद, मूग यांच्या पेरण्या उरकून घेतल्या़ तालुक्यात २0-२५ गावांत अशी पेरणी झाली आहे. मात्र उर्वरित तालुक्यात पाऊस न झाल्यामुळे पेरणीच झाली नाही़ पाऊस पडेल, या भरवशावर पेरणी केलेल्या शेतकर्‍यांची पिके जळून जात असून, अर्धा अधिक पावसाळ्याचा काळ गेल्याने दुबार पेरणीचीही शक्यता मावळली आहे. खरिपाची पिके ही शेतकर्‍यांसाठी पैसे मिळवून देणारी असतात. होते तेवढे पैसे खरिपावर खर्च केल्याने आता रब्बीसाठी पैसा कुठून आणायचा, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.
कांद्याच्या रोपासाठीही पाणी नाही
बहुतांश शेतकर्‍यांनी पाऊस पडेल, या आशेवर विहीर व बोअरला असलेल्या पाण्याच्या भरवशावर कांद्याची रोपे तयार केली. मात्र पाऊस नसल्याने पाणीही उपलब्ध नाही. ही रोपे उगवूनदेखील आली. मात्र विहिरीत रोपांना देण्याएवढे किंवा जनावरांना पिण्याएवढे पाणी नसल्यामुळे या रोपांची जोपासना करणे अवघड झाले आहे़
सर्व प्रकल्प कोरडे
बार्शी तालुक्यातील सर्व लघु, मध्यम प्रकल्प दोन महिन्यांपूर्वीच पूर्णपणे कोरडे पडले आहेत़ केवळ हिंगणी धरणात थोडेसे पाणी आहे़ ढाळेपिंपळगावचे पाणीदेखील तळाला गेले असून त्याठिकाणी देखील केवळ गाळच राहिला आहे़
बार्शीत पीकविमाही नाही
बार्शी तालुका हा मराठवाड्याच्या सीमेवरील तालुका आहे. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणेच बार्शीतही पाऊस पडतो. दोन्हीकडील पीक परिस्थितीही सारखीच आहे़ मागील वर्षी तालुक्यातील शेतकर्‍यांनी खरीप हंगामात पाच कोटी रुपयांच्या जवळपास पीक विमा भरला आहे़ मात्र शेजारच्या भूम, परंडा, कळंब या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पीक विमा मंजूर झाला. मात्र बार्शी तालुक्यात केवळ किरकोळ पेरणी झालेल्या मुगाला विमा मंजूर झाला आहे़
कोट
जुलैअखेरपर्यंत पाऊस पडला असता तर खरिपाच्या हंगामातील तूर व सोयाबीनची उशिरा पेरणी करता आली असती. मात्र पाऊसच न पडल्यामुळे आता खरीप हंगामातील पिकांची पेरणी करणे अवघड झाले आहे़ ज्यांनी पेरण्या केल्या आहेत, त्यांची पिकेदेखील पाण्याअभावी करपू लागली आहेत़ त्यामुळे शेतकर्‍यांबरोबरच सर्वजणच अडचणीत आले आहेत़
-राजेंद्र चौधरी
तालुका कृषी अधिकारी