अनुपम खेर रिअल लाईफमध्येही 'खलनायक' - योगी आदित्यनाथ

By Admin | Updated: March 9, 2016 11:52 IST2016-03-09T11:50:15+5:302016-03-09T11:52:36+5:30

आपण फक्त चित्रपटाच्या पडद्यावर नव्हे तर ख-या आयुष्यातही खलनायक आहोत हे अनुमप खेर यांनी सिद्ध केले अशी घणाघाती टीका भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी केली

'Khalnayak' in Anupam Kher Real Life - Yogi Adityanath | अनुपम खेर रिअल लाईफमध्येही 'खलनायक' - योगी आदित्यनाथ

अनुपम खेर रिअल लाईफमध्येही 'खलनायक' - योगी आदित्यनाथ

ऑनलाइन लोकमत
गोरखपूर, दि. ९ - ' आपण फक्त चित्रपटाच्या पडद्यावर नव्हे तर ख-या आयुष्यातही खलनायक आहोत हे अनुमप खेर यांनी सिद्ध केले आहे' अशी घणाघाती टीका भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी अनुपम खेर यांनी भाजपातील वाचळवीरांवर टीका करत पक्षाने त्यांच्यावर अकुंश ठेवायला हवे, असे मत व्यक्त केले होते.  'भाजपामध्ये योगी, साध्वी असे काही नेते आहेत, ते बकवास करतात, त्यांना तुरुंगात टाकायला हवं, त्यांना पक्षातूनही हाकलायला हवं' असे वक्तव्य खेर यांनी टेलिग्राफ नॅशनल डिबेटमध्ये  केले होते. 
मात्र त्यांच्या या टीकेमुळे योगी आदित्यनाथ चांगलेच दुखावले गेले असून त्यांनी खेर यांना लक्ष्य केलं. ' खलनायकाची भूमिका कशी असते हे सर्वांनाच माहित आहे. खेर हे फक्त 'रील लाईफ' मधील (चित्रपटातील) व्हिलन नव्हेत तर ते ' रिअल लाईफ'मध्येही व्हिलन (खलनायक) आहेत. याव्यतिरिक्त मला खेर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत अधिक काही बोलायचे नाही' अशी प्रतिक्रिया देत आदित्यनाथ यांनी खेर यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

Web Title: 'Khalnayak' in Anupam Kher Real Life - Yogi Adityanath