खलिस्तान कमांडो फोर्सच्या दहशतवाद्याला अटक

By admin | Published: March 21, 2017 03:48 PM2017-03-21T15:48:55+5:302017-03-21T15:54:04+5:30

दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खलिस्तान कमांडो फोर्सच्या एका दहशतवाद्याला मंगळवारी अटक केली.

Khalistan commandos arrested for the terrorists | खलिस्तान कमांडो फोर्सच्या दहशतवाद्याला अटक

खलिस्तान कमांडो फोर्सच्या दहशतवाद्याला अटक

Next
ऑनलाइन लोकमत
 
नवी दिल्ली, दि. 21 - दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खलिस्तान कमांडो फोर्सच्या एका दहशतवाद्याला मंगळवारी अटक केली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरसेवक सिंह उर्फ बदला असे या दहशतवाद्याचे नाव आहे. गुरसेवक सिंह हा खलिस्तान कमांडो फोर्स या दहशतवादी संघटनेचा सदस्य असून त्याच्या नावावर अनेक गुन्हे आहेत. दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून त्याला आज अटक केली. तसेच, त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. 
दरम्यान, गुरसेवक सिंह याच्या नावावर जवळजवळ 75 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये दहशतवादी कारवाया करणे, खून आणि दरोडे अशा वेगवेगळ्या गुन्हांचा समावेश आहे. 
 

Web Title: Khalistan commandos arrested for the terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.