गुन्हेगारांवर खाकीचा दणका
By Admin | Updated: January 30, 2016 00:17 IST2016-01-30T00:17:36+5:302016-01-30T00:17:36+5:30
तीन दिवसात २३ गुंडांवर मकोका : गुन्हेगारी विश्वाला जबर हादरा

गुन्हेगारांवर खाकीचा दणका
त न दिवसात २३ गुंडांवर मकोका : गुन्हेगारी विश्वाला जबर हादरानागपूर : प्रचंड आक्रमक झालेल्या खाकीने गुन्हेगारांना जोरदार दणका दिला आहे. आधी संतोष आंबेकर, नंतर गोल्डी भुल्लर आणि आज राजू भद्रे टोळीवर पोलिसांनी मकोका लावला. अवघ्या तीन दिवसात शहरातील तीन मोठ्या गुंडांच्या टोळ्यांवर मकोकाची कारवाई झाल्यामुळे गुन्हेगारी विश्वाला जोरदार हादरा बसला आहे. राजू भद्रे तसेच त्याच्या टोळीतील आठ गुन्हेगारांवरील मकोकाची माहिती पोलीस उपायुक्त रंजन शर्मा यांनी आज सायंकाळी पत्रकारांना दिली. ११ डिसेंबरला अजय राऊतचे अपहरण केल्यानंतर त्याला आणि त्याच्या परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन १ कोटी ७५ लाखांची खंडणी गुंडांनी उकळली होती. अजय राऊतच्या मुलाचे अपहरण करण्याची धमकी दिल्यामुळे तो एवढी मोठी खंडणी दिल्यानंतरही गप्प बसला होता. मात्र, पोलिसांना वृत्तपत्रातून या प्रकरणाची माहिती कळली. त्यानंतर गुन्हेशाखेने राऊतची चौकशी सुरू केली. राऊतने दिलेल्या तक्रारीनंतर अपहरणकर्ते आणि खंडणी उकळणारांचा पोलिसांनी शोध घेतला. तेव्हा यात नितीन वाघमारे, आशिष नायडू, कार्तिक शिवरामक्रिष्णन तेवर आणि भरत ऊर्फ राहुल सुशिल दुबे हे गुंड गुन्हेशाखेच्या हाती लागले. त्यांनी या गुन्ह्याचे सूत्रधार दिवाकर कोतुलवार आणि राजू भद्रे असल्याचे सांगितले. अपहरण केल्यानंतर राऊतला मारहाण करून राजू भद्रेच्या घरामागच्या मठात नेले आणि तेथे त्याला मित्रांना फोन करायला लावून १ कोटी ७५ लाख रुपये मागवून घेतल्याचेही उघड झाले. ही पक्की माहिती उघड झाल्यामुळेच या टोळीविरुद्ध मकोकाची कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले. उपरोक्त चार आरोपी अटकेत आहेत. राजू भद्रे कारागृहात आहे तर दिवाकर कोतुलवार (वय ३१) त्याचा भाऊ आशिष कोतुलवार (वय २८), खुशाल ऊर्फ जल्लाद ऊर्फ पहेलवान थूल आणि नितीन मोहन पाटील हे फरार असल्याचे त्यांनी सांगितले.-- मालमत्ता जप्त करणार..