मुख्य अंक : पान १ साठी सारांश
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:54+5:302015-01-23T01:05:54+5:30
आशाताईंचे सूर लागलेच नाही

मुख्य अंक : पान १ साठी सारांश
आ ाताईंचे सूर लागलेच नाहीनागपूर : आशाताईंनी आतापर्यंत अनेक अजरामर गीते रसिकांना दिली आहेत, यात वाद नाही. पण महानगरपालिकेद्वारे आयोजित नागपूर महोत्सवात आशाताईंनी रसिकांना निराश केले. त्यांनी आतापर्यंत गायिलेली त्यांचीच गीते त्यांना योग्य पद्धतीने आणि स्वरात सादर करता आली नाही. अनेकदा त्यांचा ताल चुकत होता आणि स्वरही चुकत होता. त्यामुळे यशवंच स्टेडियम, नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात आशा भोसले त्यांच्या चाहत्यांना जिंकू शकल्या नाहीत. यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे रसिकच निराश झाले. आशाताईंनी आता थांबायला हवे आणि स्टेज शो बंद करायला हवेत, असे मत यावेळी रसिकांनी व्यक्त केले. याप्रसंगी त्यांची तीन-चार गीते झाल्यावर अनेक रसिकांनी काढता पाय घेतला कारण कार्यक्रम रंगतच नव्हता.