कुरवलीच्या सरपंचपदी केशव कदम
By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:35+5:302015-08-19T22:27:35+5:30
कुरवली : येथे सरपंचपदी केशव कदम यांची बिनविरोध निवड झाली. अरुण चव्हाण यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. तात्पुरते सहीचे अधिकार उपसरपंच आंबादास कवळे यांना देण्यात आले होते.

कुरवलीच्या सरपंचपदी केशव कदम
क रवली : येथे सरपंचपदी केशव कदम यांची बिनविरोध निवड झाली. अरुण चव्हाण यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. तात्पुरते सहीचे अधिकार उपसरपंच आंबादास कवळे यांना देण्यात आले होते. सरपंचपदासाठी सोमवारी मतदान घेण्यात आले; परंतु दोन अर्जांपैकी कल्पना पांढरे यांनी अर्ज माघारी घेतल्याने सरपंचपदाची निवड बिनविरोध झाली. सरपंच कदम यांचा सत्कार बाजार समितीचे माजी सभापती विलास माने यांच्या हस्ते करण्यात आला. निवडणूक अधिकारी म्हणून सी. डी. जगताप यांनी काम पाहिले.या वेळी उपसरपंच आंबादास कवळे, ग्रामविकास अधिकारी अरुण आवळे, अरुण आवळे, विजय चव्हाण, दिलीप पांढरे आदी उपस्थित होते.फोटो ओळी : कुरवलीचे नूतन सरपंच केशव कदम यांचा सत्कार करताना माजी सभापती विलास माने, उपसरपंच आंबादास कवळे.१९०८२०१५-बारामती-०३