शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केशर पान मसाला कंपनीच्या मालकाच्या पत्नीचा भीषण अपघातात मृत्यू, आग्रा एक्स्प्रेस वेवर झाली दुर्घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 13:24 IST

Kesar Pan Masala Owner wife Preeti Makhija Death: प्रख्यात पान मसाला कंपनी केशरचे मालक हरिश मखिजा यांच्या पत्नीचा उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरिश माखिजा यांची पत्नी प्रिती माखिजा यांच्या कारचा टायर इटावाजवळ आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वे जवळ अचानक फुटला आणि हा अपघात झाला.

प्रख्यात पान मसाला कंपनी केशरचे मालक हरिश मखिजा यांच्या पत्नीचा उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरिश माखिजा यांची पत्नी प्रिती माखिजा यांच्या कारचा टायर इटावाजवळ आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वे जवळ अचानक फुटला आणि हा अपघात झाला. अपघातग्रस्त कारमधून केशर पान मसाला कंपनीचे मालक हरिश माखिजा यांची पत्नी प्रिती माखिजा यांच्यासह कानपूरचे प्रसिद्ध मद्य व्यावसायिक तिलक राज शर्मा यांची पत्नी आणि ड्रायव्हर प्रवास करत होते. अपघातात प्रिती माखिजा यांचा मृत्यू झाला. तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले. 

अपघातातबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार हरिश माखिजा आणि तिलक राज शर्मा हे त्यांच्या कुटुंबीयांसह एका खासगी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आग्रा येथे जात होते. त्यांची कार ७९ मैनपूरीमधील करहल टोलनाक्याजवळ आली असताना अचानक कारचा टायर फुटला आणि ती उलटली.  

मृत प्रिती माखिजा यांचा मुलगा पीयूष माखिजा याने सांगितले की, अपघात झाला तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. तसेच कारचा वेगही अधिक होता. याचदरम्यान, अचानक टायर फुटला आणि गाडी उलटून त्यात माझ्या आईचा मृत्यू झाला. तसेच आणखी एक महिलाही या अपघातात जखमी झाली आहे.

प्रसारमाध्यमांमधून समोर येत असलेल्या वृत्तानुसार लँडमार्क हॉटेलचे चेअरमन दीपक कोठारी यांची पत्नी दीप्ती कोठारी या सुद्धा या अपघातात गंभीर जखणी झाल्या आहेत. त्यांनी सैफई येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. दीप्ती हिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश