केरळचा रहिवासी याह्या अमेरिकेच्या हल्ल्यात ठार

By Admin | Updated: May 1, 2017 03:48 IST2017-05-01T03:48:38+5:302017-05-01T03:48:38+5:30

गेल्यावर्षी इस्लामिक स्टेटमध्ये (आयएस) सामील झाला, असे मानला गेलेला याह्या हा अफगाणिस्तानात अमेरिकेने केलेल्या

Keralite jihadis killed in US attack | केरळचा रहिवासी याह्या अमेरिकेच्या हल्ल्यात ठार

केरळचा रहिवासी याह्या अमेरिकेच्या हल्ल्यात ठार

कासारगोड : गेल्यावर्षी इस्लामिक स्टेटमध्ये (आयएस) सामील झाला, असे मानला गेलेला याह्या हा अफगाणिस्तानात अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झाला. याह्या हा केरळचा रहिवासी होता.
याह्याच्या कुटुंबियांना शनिवारी रात्री त्याच्या मृत्यूचा संदेश तारेद्वारे मिळाला, असे सामाजिक कार्यकर्ते बीसीए रहिमान यांनी सांगितले.
हा संदेश असफाक याने पाठवला असून, संदेशात याह्या हा अमेरिकेच्या हल्ल्यात ‘हुतात्मा’ झाल्याचे म्हटले. अमेरिकेच्या दलांशी लढताना तो मारला गेला, असे संदेशात म्हटले आहे. मात्र, तो केव्हा मारला गेला याचा खुलासा त्यात नाही.

Web Title: Keralite jihadis killed in US attack