शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

गांधींच्या आत्मकथनाला केरळमध्ये सर्वाधिक मागणी, विविध भाषांत ५७.७४ लाख प्रतींची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 04:31 IST

गुजरात ही महात्मा गांधींची जन्मभूमी असली तरी ‘सत्याचे प्रयोग’ या त्यांच्या आत्मकथेला केरळमध्ये सर्वाधिक मागणी आहे.

अहमदाबाद : गुजरात ही महात्मा गांधींची जन्मभूमी असली तरी ‘सत्याचे प्रयोग’ या त्यांच्या आत्मकथेला केरळमध्ये सर्वाधिक मागणी आहे. आत्मकथनाच्या मल्याळम अनुवादाच्या ८.२४ लाख प्रती तर गुजरातीतील ६.७१ लाख प्रती आजवर विकल्या गेल्याआहेत.सत्याचे प्रयोग या आत्मकथनाची गुजराती भाषेतील मूळ आवृत्ती १९२७ साली प्रकाशित झाली. या पुस्तकाचा मल्याळी भाषेत १९९७ साली अनुवाद झाला.नवजीवन ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त विवेक देसाई यांनी सांगितले की, केरळमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. तेथील शाळा, महाविद्यालयांमध्ये पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. गुजरातपेक्षा केरळमध्ये वाचनसंस्कृती अधिक बहरली आहे. त्यामुळेच सत्याचे प्रयोगच्या मल्याळी अनुवादाला तिथे जास्त प्रतिसाद मिळाला.महात्मा गांधींच्या आत्मकथनाचे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यातील इंग्रजी अनुवादाच्या आजवर सर्वाधिक २०.९८ लाख प्रती विकल्या गेल्या. त्याखालोखाल मल्याळम, त्यानंतर तामिळ (७.३५ लाख), हिंदी (६.६३ लाख) भाषांतील अनुवादांची विक्री झाली.या आत्मकथनाचा मराठी, आसामी, उडिया, मणिपुरी, पंजाबी, कन्नड, संस्कृत अशा अनेक भाषांतही अनुवाद झाला असून एकूण ५७.७४ लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.महात्मा गांधींचे आत्मकथन ५०० पानांचे असून त्याची किंमत ८० रुपये आहे. या पुस्तकाचा २०१४ साली पंजाबी भाषेत अनुवाद झाल्यानंतर २० हजार प्रतींची विक्री झाली होती.डोग्री भाषेत १९६८ साली महात्मा गांधींचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले व हजार प्रती विकल्या गेल्या. आता डोग्रीतील नवी आवृत्ती काढण्याचे प्रकाशकांनी ठरविले आहे. बोडो भाषेतही अनुवादाचे काम सुरूआहे. (वृत्तसंस्था)गांधीजींना मंदिरबंदीमहात्मा गांधींच्या आत्मकथनाच्या सर्वात जास्त प्रती केरळमध्ये विकल्या गेल्या असल्या तरी १९२५ साली त्यांना कन्याकुमारी येथील भगवती देवीच्या मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. ब्रिटिश राजवटीत कन्याकुमारी हे केरळच्या त्रावणकोर संस्थानचा एक भाग होते.इंग्लंडचा दौरा करून गांधीजी परतले होते. सागरी प्रवास करून विदेशात जाणे हे पुजाऱ्याच्या लेखी ‘पाप’ असल्याने त्याने महात्मा गांधींना मंदिरात प्रवेशबंदी केली होती.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीKeralaकेरळ