शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

H1N1 Virus : सावधान! H1N1 पुन्हा झाला जीवघेणा; व्हायरसमुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 14:32 IST

H1N1 Virus : लोकांना H1N1 व्हायरस संसर्गामुळे तापासह इतर लक्षणांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील कुट्टीपुरममध्ये काही दिवसांपूर्वी तापामुळे मृत्यू झालेल्या 13 वर्षांच्या मुलाला H1N1 व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मुलगा कुट्टीपुरमजवळील पेनकन्नूर येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी आर रेणुका यांनी गुरुवारी पुष्टी केली की मुलाचा मृत्यू H1N1 व्हायरसच्या संसर्गामुळे झाला आहे.

रेणुका यांनी लोकांना H1N1 व्हायरस संसर्गामुळे तापासह इतर लक्षणांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, H1N1 व्यतिरिक्त डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिसच्या धोक्याबाबतही लोकांनी सतर्क राहायला हवं. रेणुका यांनी सांगितलं की, अलीकडेच मलप्पुरममध्ये डेंग्यूमुळे मृत्यूची दोन प्रकरणे समोर आली आहेत.

H1N1 व्हायरस म्हणजे काय?

स्वाइन फ्लूला H1H1 व्हायरस असंही म्हणतात. हा एक प्रकारचा इन्फ्लूएंझा व्हायरस आहे जो सामान्य खोकला आणि सर्दीपासून सुरू होतो. हेल्थलाइनच्या मते, हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. 2009 मध्ये लक्षणं सर्वप्रथम माणसांमध्ये दिसून आली. हा आजार जगभर पसरला आहे. WHO ने 2010 मध्ये H1H1 ला महामारी घोषित केलं. कोविड-19 प्रमाणे, त्याच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करणं आवश्यक असू शकतं.

H1N1 व्हायरसची लक्षणं काय आहेत?

H1N1 व्हायरसची लक्षणं इतर फ्लू व्हायरससारखीच असतात.- मधूनमधून ताप येणे. - स्नायू दुखणे- थंडी वाजणे- खोकला- घसा खवखवणे- सर्दी- डोळे लाल होणे- शरीर दुखणे- डोकेदुखी-  थकवा आणि अशक्तपणा

तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा जेणेकरून योग्य उपचार दिले जातील आणि वेळेत उपचार करता येतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स