शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

केरळात पावसाच्या बळींची संख्या ११३; अद्यापही २९ नागरिक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 2:19 AM

मलप्पुरममध्ये ५० आणि वायनाडमधील १२ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.

तिरुवनंतपुरम : केरळच्या पूरग्रस्त भागातील शिबिरातील स्थलांतरित लोक आता घरी परतू लागले आहेत. तथापि, भूस्खलन आणि पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या मलप्पुरम आणि वायनाड जिल्ह्यात अनेक मृतदेह आढळून आले आहेत. राज्यातील मृतांची संख्या शनिवारी ११३ वर पोहोचली आहे.

मलप्पुरममध्ये ५० आणि वायनाडमधील १२ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या जिल्ह्यात भूस्खलनाच्या सर्वाधिक घटना झाल्या होत्या. या ठिकाणी आता सर्च आॅपरेशन सुरू आहे. हैदराबादेतील एक विशेष टीम कवलप्परा येथे जीपीआरसह दाखल होत आहे. या माध्यमातून ढिगाऱ्याखाली दडलेल्या मृतदेहांचा शोध लावता येणार आहे. मलप्पुरममध्ये २१, वायनाडमध्ये ७ आणि कोट्टायममध्ये १ जण बेपत्ता आहे. पाऊस आणि पुरामुळे १२,७६१ घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ११८६ घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. ८०५ शिबिरात १,२९,५१७ लोक राहत आहेत.हिमाचलमध्ये ६ लोकांना वाचविलेसिमला : हिमाचल प्रदेशात जोरदार पावसाने कहर केला असून, पालमपूरमध्ये पुरामुळे फसलेल्या ६ जणांना वाचविण्यात आले आहे. कांगडामध्ये सर्व शिक्षण संस्था बंद करण्यात आल्या आहेत, तर कांगडा आणि चम्बा जिल्ह्यात भूस्खलनानंतर अनेक रस्ते अद्याप बंद आहेत. आगामी दोन दिवस काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने अनेक नद्यांना पूर आला आहे.मध्यप्रदेशात पावसाचे आतापर्यंत ७० बळीभोपाळ : पश्चिमी मध्यप्रदेशच्या काही भागांत सततच्या पावसाने पूर कायम आहे. पूर आणि संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, राज्याच्या इतर भागांत शुक्रवारपासून पाऊस कमी झाला आहे. महसूल विभागाच्या अतिरिक्त सचिव जी. व्ही. रश्मी यांनी सांगितले की, ७० पैकी १५ जणांचा मृत्यू वीज कोसळून झाला आहे.येत्या २४ तासांत राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इंदिरा सागरसह सहा मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पूरग्रस्त भागातून आतापर्यंत ११७ लोकांना वाचविण्यात आले आहे. पुरामुळे ४२९८ लोक विस्थापित झाले आहेत, तर २३६८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.कोलकात्यात मुसळधार पावसाचा इशाराकोलकाता : पश्चिम बंगालसह अन्य राज्यांत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात काही भागांत वीज कोसळून किमान चार जणांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले आहेत.राजस्थानात जनजीवन विस्कळीतजयपूर : राजस्थानात गत काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्त कोटा आणि आजूबाजूच्या भागांत परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. राजस्थानच्या माऊंट अबूमध्ये शुक्रवार ते शनिवारी सकाळपर्यंत १३७ मि.मी. पाऊस झाला.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर