शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जगात मंदी, पण 'या' राज्यात पोलिसांना मिळतेय नोकरीची संधी, ४८ हजारांपर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 10:42 IST

पोलीस कॉन्स्टेबलच्या 125 जागांसाठी महिला आणि पुरुष उमेदवारांची भरती होईल. या पदांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येतील.

थिरुअनंतपूरम : कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असून, अनेक देशांनी त्याला थोपवण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला आहे. लॉकडाऊनच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखणं हे पोलिसांसाठीही एक आव्हानच आहे. बऱ्याचदा नागरिक पोलिसांना न जुमानता रस्त्यावर फिरतात किंवा मॉर्निंग वॉकला जातात. त्यामुळे अशांवर पोलिसांना अखेर कारवाई करावी लागते. तसेच गुन्हेगारीही एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्या तुलनेत पोलिसांचं संख्याबळ कमी पडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केरळ लोकसेवा आयोगाने पुरुष आणि महिला गटातील पोलीस कॉन्स्टेबलच्या पदांसाठी भरती काढली असून, रिक्त जागा लवकरात लवकर भरल्या जाणार असल्याचं सांगितलं आहे. पोलीस भरतीसाठी आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करता येऊ शकतात. अर्ज करू इच्छिणारे उमेदवारांनी keralapsc.gov.in वर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. पोलीस कॉन्स्टेबलच्या 125 जागांसाठी महिला आणि पुरुष उमेदवारांची भरती होईल. या पदांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येतील.पोलीस कॉन्स्टेबल (पुरुष) 90 पदांची भरती करण्यात येणार आहे, तर पोलिस कॉन्स्टेबल (महिला) 35 पदांची भरती करण्यात येणार असून, एकूण  पदांची संख्या 125 एवढी आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी SSLC पास केलेली असावी. या पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 31 वर्षे असावे.20 मे 2020 ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात होणार असून,  ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख 31 जुलै 2020 देण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांना कोणतीही अर्ज फी जमा करावी लागणार नाही. इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करतात. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांवर अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा / ओएमआर / ऑनलाइन चाचणी आणि शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 22,200-48000 रुपये दिले जातील.

टॅग्स :PoliceपोलिसKeralaकेरळ