शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

"काँग्रेस १०० पेक्षा जास्त घरे बांधणार", वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 20:33 IST

Rahul Gandhi on Kerala landslides : राहुल गांधी यांनी भूस्खलनग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Kerala landslides : केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलन झाल्यामुळं ३०८ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. तसेच, भूस्खलनाच्या दुर्घटनेमुळे अद्याप शेकडो लोक बेपत्ता आहेत. या दुर्घटनेनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाडला भेट दिली असून भूस्खलनग्रस्तांशी संवाद साधला. यादरम्यान राहुल गांधी यांनी भूस्खलनग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस १०० पेक्षा जास्त घरे बांधून देणार असे राहुल गांधी यांनी सांगितले.

एएनआय या वृत्तसंस्थेशी राहुल गांधी यांनी शुक्रवारी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी म्हणाले, "मी कालपासून येथे आहे, काल घटनास्थळी जाऊन भूस्खलन घडलेल्या भागाची पाहणी केली. आम्ही शिबिरांमध्ये गेलो होतो, आम्ही तेथील परिस्थितीचं आकलन केलं. त्यानंतर प्रशासनाबरोबर बैठकही घेतली आहे. यावेळी प्रशासनाने आम्हाला या दुर्घटनेतील मृतांची संख्या आणि नुकसान झालेल्या घरांबाबत माहिती दिली. यावेळी काँग्रेसकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल." 

याचबरोबर, वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस १०० पेक्षा जास्त घरे बांधून देणार असे राहुल गांधी यांनी सांगितलं. तसंच, केरळने अशी घटना याआधी कधीही पाहिली नाही किंवा मला वाटतं केरळ सारखी अशी घटना एकाही प्रदेशात पाहिली नाही. या दुर्घटनेसंदर्भात मी केरळच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहे. याशिवाय, दिल्लीतही याबाबत चर्चा करण्यात येणार आहे, असंही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.

जवळपास ३०० लोक अद्याप बेपत्ता -एम. आर. अजित कुमारदरम्यान, केरळच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रभारी एडीजीपी एम.आर. अजित कुमार यांनी शुक्रवारी (२ ऑगस्ट) सकाळी माहिती देताना सांगितलं की, वायनाडमधील भूस्खलन दुर्घटनेत अद्याप ३०० लोक बेपत्ता आहेत. तसंच, जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, वायनाडमधील ९१ मदत शिबिरांमध्ये ९,३२८ लोक राहत आहेत. दरम्याान, महसूल विभाग माहिती गोळा करण्यात व्यस्त आहे. अशा स्थितीत येत्या एक-दोन दिवसांत चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKeralaकेरळlandslidesभूस्खलन