शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

Kerala Floods : ऑगस्टच्या पावसाचा 87 वर्षांतील उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 09:54 IST

केरळमध्ये ऑगस्ट महिन्यात 20 दिवस पडलेल्या पावसाने विक्रमी उच्चांक गाठला आहे.

तिरुवनंतपुरम : महापुराने अक्षरशः वेढलेल्या केरळची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. केरळमध्ये ऑगस्ट महिन्यात 20 दिवस पडलेल्या पावसाने विक्रमी उच्चांक गाठला आहे. हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये गेल्या 87 वर्षांनंतर यंदा ऑगस्ट महिन्यात असा विक्रमी पाऊस पहिल्यांदाच पडला आहे. 1 ते 20 ऑगस्टदरम्यान यंदा केरळमध्ये 771 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 87 वर्षांनंतर पहिल्यांदाच इतका पाऊस पडला आहे. हवामान विभागाचे अधिकारी पुलक गुहाठाकुरता यांनी सांगितले की, 1931 साली राज्यात ऑगस्ट महिन्यात 1132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. हा सर्वाधिक जास्त पावसाचा महिना होता.  या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाची नोंद अडीच पट जास्त आहे. इडुक्की जिल्ह्यात या महिन्यात पावसाचा 111 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त पाऊस पडला. ऑगस्टपर्यंत याठिकाणी 14419 मिलीमीटर पाऊस पडला आहे. याआधी 1907 मध्ये इडुक्कीमध्ये 1387 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. 

केरळमधील जलप्रलय गंभीर आपत्ती घोषित केरळमधील जलप्रलयाला केंद्र सरकारने गंभीर आपत्ती म्हणून घोषित केले आहे. या महापुरामध्ये आजपर्यंत 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत पावसाची तीव्रता कमी होणार आहे. 

युएईच्या उद्योजकांकडून 12.5 कोटींची मदतकेरळच्या मदतीसाठी जगभरातून हात पुढे आले आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये असलेल्या तीन भारतीय उद्योजकांनी 12.5 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तर युएईने 34 कोटी रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळRainपाऊस