शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शेवटी आईच ती! ज्या मुलाने चाकूने सपासप वार केले, त्यालाच तुरुंगात जाण्यापासून वाचवलं, कोर्टात म्हणाली...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 18:10 IST

Kerala Crime News: मुलं कशीही असली, ती तिच्यासोबत कशीही वागली, तरी आईचं काळीज हे नेहमी तिच्यासाठीच धडधडत असतं, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय देणारी घटना केरळमध्ये घडली आहे. येथे एका आईने तिच्यावर चाकूने वार करून जखमी करणाऱ्या मुलाला तुरुंगात जाण्यापासून वाचवलं आहे.

मुलं कशीही असली, ती तिच्यासोबत कशीही वागली, तरी आईचं काळीज हे नेहमी तिच्यासाठीच धडधडत असतं, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय देणारी घटना केरळमध्ये घडली आहे. येथे एका आईने तिच्यावर चाकूने वार करून जखमी करणाऱ्या मुलाला तुरुंगात जाण्यापासून वाचवलं आहे. मी माझ्या मुलाला तुरुंगात गेलेलं पाहू शकत नाही, असा जबाब कोर्टात नोंदवल्यानंतर केरळ हायकोर्टाने संवेदनशील भूमिका घेत आईचा जबाब ग्राह्य धरून मुलाला जामीन मंजूर केला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना नववर्षाचं स्वागत करत असताना घडली होती. त्यावेळी मुगला सिमेल याने आईकडे पैसे मागितले होते. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिल्यावर तो चांगलाच संतापला होता. त्याने रागाच्या भरात आईवर सपासप वार केले होते. त्यात आईला १२ गंभीर जखमा झाल्या होत्या. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी  आरोपी सिमेल याला अटक केली होती. तसेच त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नासह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, सिमेल याला अटक करण्यात आल्यानंतर त्याने कोर्टात जामिनासाठी अर्ज दिला होता. मात्र जोपर्यंत आरोपीची आई तिची कुठलीही तक्रार नसल्याचे सांगत नाही, तोपर्यंत जामीन मिळू शकत नाही, असे कोर्टाने सांगितले. त्यानंतर आईने कोर्टामध्ये शपथपत्र सादर करत सांगितले की, माझी कुठलीही तक्रार नाही आहे. मी माझ्या मुलाला तुरुंगात पाहू शकत नाही. आईने दिलेल्या या जबाबानंतर कोर्टाने आपल्या भूमिकेत बदल करत सिमेल याला जामीन मंजूर केला.

या प्रकरणात निर्णय देताना न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन यांनी सांगितले की, हे एका दु:खी आईचे अश्रूंनी भरलेले शब्द होते. कदाचित आईने तिला जखमांमधून होत असलेल्या वेदना विसरून  मुलाला माफ केलं असावं. आईचं प्रेम हे गुलाबाच्या फुलासारखं असतं. परिस्थिती कितीही खडतर असली तरी ते फुलतच राहतं, असेही न्यायमूर्ती यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारKeralaकेरळ