शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

औषधाच्या नावाखाली विष पाजून प्रियकराची हत्या; कोर्टाने तरुणीला दिली मृत्यूदंडाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:09 IST

केरळमधील २४ वर्षीय तरुणीला प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Sharon Raj Murder : प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी केरळन्यायालयाने २४ वर्षीय महिलेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. शेरोन राज हत्याकांडातील आरोपी ग्रीष्माला केरळमधील तिरुअनंतपुरम येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. २६ वर्षीय ग्रीष्माला न्यायालयाने दोषी ठरवलं. ग्रीष्माचा मामा निर्मल कुमार हा देखील पुरावे नष्ट करणे आणि कट रचल्याबद्दल दोषी आढळला आहे. त्यामुळे निर्मललाही तीन वर्षांची शिक्षा सुनावली. 

२०२२ मध्ये शेरॉन राज (२३) या तरुणाचा मृत्यू झाला होती. मृत शेरॉन राज हा मूळचा तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील परसाला येथील रहिवासी होता. ग्रिष्माला तिचा प्रियकर शेरॉन याला आयुर्वेदिक औषधात विषारी रसायन मिसळून दिल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या घटनेत शेरॉनचा मृत्यू झाला. कोर्टाकडून शिक्षा सुनावली जात असताना ग्रीष्मा शांत उभा राहिली होती. परंतु कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या शेरॉनच्या पालकांना अश्रू अनावर झाले होते.

नेयत्तींकारा जिल्हा सत्र न्यायालयाने ग्रीष्माचे मामा निर्मला कुमारन नायर यालाही पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरवले. ग्रीष्माची आई सिंधू या प्रकरणात सहआरोपी होती पण पुराव्याअभावी तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांतर्गत ग्रीष्माला दोषी ठरवण्यात आले. तिच्या मामाला आयपीसीच्या कलम २०१ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. हा गुन्हा जघन्य असून दोषीला कोणतीही सवलत मिळू नये, अशी टिप्पणी कोर्टाने केली. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही निर्दोष तपास केल्याबद्दल पोलिस तपास पथकाचे कोर्टाने कौतुक केले.

शेरॉन राजला मुख्य आरोपी ग्रीष्माने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील रामवरमंचिराई येथील तिच्या घरी बोलावले होते.  तिने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये कीटकनाशक मिसळून त्याला प्यायला दिले. ११ दिवसांनंतर २५ ऑक्टोबर २०२२ रोजी शेरॉनचा रुग्णालयात मृत्यू झाला. याआधी त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. याआधीही ग्रीष्माने शेरॉनला फळांच्या रसात पॅरासिटामॉलच्या गोळ्या मिसळून पाजायचा प्रयत्न केला होता. पण कडवट चवीमुळे त्याने ते पिण्यास नकार दिला. त्यामुळे अयशस्वी ठरलेल्या ग्रीष्माने आयुर्वेदिक औषधातातून शेरॉनला संपवलं.

ग्रीष्मा त्यावेळी २२ वर्षांची होती. नागरकोइल येथील लष्करी जवानासोबत तिचे लग्न ठरले असल्यामुळे शेरॉन राजच्या हत्येचा कट रचला होता. शेरॉन राजने ग्रीष्मासोबत असलेले त्यांचे नाते संपवण्यास नकार दिला होता. त्यामुळे ग्रीष्माने घरच्यांसह मिळून शेरॉनला संपवलं. सुरुवातीला ग्रीष्मा आणि शेरॉनचे नाते घट्ट होते. पण ग्रिष्माने दुसऱ्याशी साखरपुडा केल्यानंतर हे नाते बिघडले. ग्रीष्माने शेरॉनशी तिचे नातेसंबंध संपवण्याचा प्रयत्न केला होता. शेरॉनने वेट्टुकडू चर्चमध्ये ग्रीष्माशी प्रतीकात्मक लग्न केले आणि तिच्या कपाळावर 'सिंदूर' देखील लावले होते. 

टॅग्स :KeralaकेरळCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिस