शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये सरसंघचालकांना ध्वजरोहणापासून रोखणा-या जिल्हाधिका-याची बदली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 12:16 IST

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजरोहण करण्यापासून रोखणारे पलक्कडचे जिल्हाधिकारी पी. मेरीकुट्टी यांची बदली करण्यात आली आहे.  

तिरुअनंतपुरम, दि. 17 - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजरोहण करण्यापासून रोखणारे पलक्कडचे जिल्हाधिकारी पी. मेरीकुट्टी यांची बदली करण्यात आली आहे.  मात्र, या बदलीचा आणि मोहन भागवत यांना ध्वजरोहणापासून रोखल्याच्या घटनेचा काहीही संबंध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नियमानुसार ही बदली करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

नेमके काय आहे प्रकरण ?केरळमधील पलक्कड येथील एका सरकारी शाळेत सरसंघचालक मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजरोहण करण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र परवानगी मिळाल्यानंतर भागवत यांनी ध्वजरोहण केले व स्वातंत्र्यदिनदेखील साजरा केला होता. स्वातंत्र्यदिनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रमुखाकडून ध्वजरोहण केले जाऊ नये, अशी नोटीस पलक्कडचे जिल्हाधिकारी पी.मेरीकुट्टी यांनी काढली होती.  पलक्कडमध्ये सरसंघचालकांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजरोहण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरच ही नोटीस काढण्यात आल्याची चर्चा होती.  

गेले काही महिने केरळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वातील सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. केरळमध्ये हे सरकार अस्तित्वात आल्यापासून गेल्या संघ कार्यकर्त्यांवरील हल्ले व हत्या प्रकरणातही वाढ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.  

आणखी बातम्या वाचा

(रस्त्यावर नमाज रोखू शकत नाही तर, पोलीस स्थानकात जन्माष्टमी कशी थांबवू - योगी आदित्यनाथ)(परवानगी मिळाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं ध्वजारोहण)(विद्यार्थ्यांदेखत शिक्षिकेला जाळलं जिवंत)केरळमध्ये आरएसएस कार्यकर्त्याची हत्याकेरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती.  राजेश असे या कार्यकर्त्याचे नाव असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून घरी जाताना त्याच्यावर येथील श्रीकार्यम परिसरात हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने राजेशवर हल्ला केला.  रुग्णालयात त्याला नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी त्याच्यावर तब्बल 20 वेळा चाकूने वार केले होते.  दरम्यान, राजेशच्या हत्येमागे सीपीआय-एमचा हात असल्याचा आरोप केरळचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कुमानाम राजशेखरन यांनी केला होता.  

टॅग्स :BJPभाजपा